उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव, मोघा या महसुली विभागात दुष्काळ घोषित ; ना. संजय बनसोडे यांच्या मागणीला यश

तोंडार, नागलगाव, मोघा या महसुली मंडळातील शेतक-यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन मानले आभार

3 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

उदगीर : मतदारसंघातील उदगीर तालुक्यात सर्वसाधारणपणे सर्वच महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती होती. परंतु राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमध्ये काही महसुली मंडळांचाच समावेश करण्यात आलेला आहे. तर उदगीर तालुक्यातील काही महसुली मंडळात यापुर्वीच दुष्काळ जाहिर करण्यात आला होता. त्यात उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव, मोघा या महसुली मंडळे राहिली असल्याने या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन सदर तीन महसूल मंडळात दुष्काळ जाहिर करण्यासाठी लेखी पत्राव्दारे विनंती केली होती. त्यांची मागणी मान्य झाली असुन उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव, मोघा या महसुली विभागात दुष्काळ घोषित करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे अशा वर नमूद दि.१० नोव्हेंबर, २०२३ च्या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट “अ” येथे नमूद केलेल्या एकूण १०२१ महसुली मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी, लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये दर्शविलेली २२४ नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून त्या महसुली मंडळांकरिता शासनाची मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव, मोघा या महसुली विभागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे तर उर्वरीत महसूल मंडळात यापूर्वीच दुष्काळ घोषीत करण्यात आला होता.

सदरील महसुली मंडळांचा राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या महसुली मंडळात समावेश करुन विशेष सवलती लागू करण्यात याव्या अशी मागणी क्रीडा व युवा कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी आपत्ती व्यवस्थापण मंत्री अनिल पाटील यांच्याकडे नोव्हेंबर – २०२३ मध्ये लेखी निवेदनाव्दारे केली होती. ना.बनसोडे यांच्या मागणीचा विचार करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापण मंत्री अनिल पाटील यांनी संबंधित विभागास दिले होते त्यामुळेच उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव, मोघा या महसुली विभागात दुष्काळ घोषित करण्यात आला असल्याने क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आपत्ती व्यवस्थापण मंत्री अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. तोंडार, नागलगाव, मोघा या महसुली मंडळातील शेतक-यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!