कव्हेकरांकडून कोळपा-भातखेडा येथील मंदिरास भेट 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधी : लातूर तालुक्यातील कोळपा भातखेडा येथे उभारण्यात आलेल्या शिवलिंग, नंदी, मन्मथ स्वामी मूर्ती प्रतिष्ठापणा व 54 फुट उंच मंदिरचा कलशारोहन सोहळा 21 एप्रिल रोजी श्री.श्री.श्री.1008 जगद‍्गुरू सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी श्री.उज्जयिनी सद‍्धर्म सिंहासन महासंस्थानपीठ, उज्जयिनी कर्नाटक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या धार्मिक ऐतिहासिक सोहळ्याची निमंत्रण मिळाल्यामुळे भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी या मंदिरास भेट देऊन येथील शिवलिंग, नंदी आणि मन्मथ स्वामी मूर्तीचे दर्शन मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे सर्वेसर्वा मनोहर हणमंतराव पाटील, सोमेश्‍वर मनोहर पाटील, नागेश सोमश्‍वर पाटील, विनायक मुमाने, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, व्यंकट सूरशेट्टे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंदिर संयोजन समितीच्या वतीने माजी आ. कव्हेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन मनोहर पाटील यांचा सत्कार केला तर जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके यांचा सत्कार सोमेश्‍वर मनोहरराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या अखंड शिवनाम सप्‍ताह, शिवलिंग, नंदी आणि मन्मथ स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्यास कोळपा, भातखेडा परिसरासह भातांगळी, सोनवती, कासारखेडा, चिकटना, भडी, पंचक्रोषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!