काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगेंसाठी प्रियांका गांधी मैदानात, आज उदगीरात जाहीर सभा

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ठिकठिकाणी स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची शनिवारी (दि. 27) दुपारी जाहीर सभा होणार आहे. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि. 27) दुपारी 3 वाजता शहरातील मेन रोडवरील जिल्हा परिषद मैदानावर सभा होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!