कारवाई : बेकायदा मद्यनिर्मिती, मद्यविक्रीसह वाहतूक प्रकरणी एकोणीस गुन्हे दाखल

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून लातूर जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात निर्भयपणे पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, एफएसटी पथक यांच्या संयुक्त पथकाने ३० एप्रिल २०२४ ते ३ मे २०२४ या कालावधीत विशेष मोहीम राबवून लातूर जिल्ह्यात बेकायदा मद्यनिर्मिती, मद्यविक्रीसह वाहतूक प्रकरणी एकोणीस गुन्हे दाखल करून सतरा जणांना अटक केली. सदर कारवाईमध्ये तीन लाख सात हजार आठशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२०११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे राज्य उत्पादन शुल्क, लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!