कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी ऊर्जा

2 Min Read

कृषी महोत्सवात शेतकरी बचत गटांच्या तयार केलेल्या वस्तू पाहायला गर्दी

 

Contents
कृषी महोत्सवात शेतकरी बचत गटांच्या तयार केलेल्या वस्तू पाहायला गर्दीलातूर : भारत हा कृषिप्रधान देश असून आपली नाळ शेतीशी जोडलेली आहे. हवामान बदलामुळे शेतीवर विविध संकटे येत आहेत. यावर मात करण्यासाठी, तसेच कमी खर्चात अधिक उत्पन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतीमध्ये वापर करणे आवश्यक आहे. यासोबतच कृषि उत्पादनांचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यावर भर देण्याची गरज आहे. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने ८ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी विविध बियाणे कंपनीचे स्टॉल्स, औषधी, खते, विविध औजारे, कृषी तंत्रज्ञान, फळ, भाजीपाला सह कृषी कंपन्या, शेतकरी गट, महिला गट, यांनी सहभाग घेतला आहे. त्यासाठी कृषि व गृहपयोगी वस्तूंचे 177 स्टॉल्स लावण्यात आले असून या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होताना दिसत आहे. शेतकरी आणि महिला गटांनी तयार केलेल्या या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महिला बचतगटांचे खाद्य पदार्थांचे स्टॉलही याठिकाणी उभारण्यात आले आहेत. याशिवाय ऊस उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान व विक्रमी ऊस उत्पादनाचा शेतकऱ्यांचा स्वानुभव विषयावर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील ब्रह्मदेव नवनाथ सरडे मार्गदर्शन, ऊस पिकातील सुधारित वाण व हंगामनिहाय पिक व्यवस्थापन याविषयावर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील मध्यवर्तीय ऊस संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त ऊस पैदासकार डॉ. भारत रासकर यांचे मार्गदर्शन तर राजाराम सूर्यवंशी यांचे फर्टीगेशन, ठिबक सिंचन संच देखभाल व आम्लप्रक्रिया विषयावर मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी ऊर्जा मिळताना दिसत असून कृषी महोत्सवात शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळताना दिसत आहे. हा महोत्सव राज्याला व जिल्ह्याला दिशादर्शक ठरताना दिसत आहे.अटल भुजल योजनेचा स्टॉल लक्ष वेधणाराअटल भुजल योजनेचा उद्देश भूजल कमी होण्याच्या समस्येचे निराकरण करणे आणि भारतातील शाश्वत भूजल व्यवस्थापनास प्रोत्साहन देणे हा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गंभीर पाणी टंचाईच्या समस्येचे निराकरण करणे आणि शाश्वत भूजल व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा आहे. यासंदर्भात कृषी महोत्सवात जनजागृती पर स्टॉल लावण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लातूर : भारत हा कृषिप्रधान देश असून आपली नाळ शेतीशी जोडलेली आहे. हवामान बदलामुळे शेतीवर विविध संकटे येत आहेत. यावर मात करण्यासाठी, तसेच कमी खर्चात अधिक उत्पन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतीमध्ये वापर करणे आवश्यक आहे. यासोबतच कृषि उत्पादनांचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यावर भर देण्याची गरज आहे. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने ८ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी विविध बियाणे कंपनीचे स्टॉल्स, औषधी, खते, विविध औजारे, कृषी तंत्रज्ञान, फळ, भाजीपाला सह कृषी कंपन्या, शेतकरी गट, महिला गट, यांनी सहभाग घेतला आहे. त्यासाठी कृषि व गृहपयोगी वस्तूंचे 177 स्टॉल्स लावण्यात आले असून या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होताना दिसत आहे. शेतकरी आणि महिला गटांनी तयार केलेल्या या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महिला बचतगटांचे खाद्य पदार्थांचे स्टॉलही याठिकाणी उभारण्यात आले आहेत. याशिवाय ऊस उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान व विक्रमी ऊस उत्पादनाचा शेतकऱ्यांचा स्वानुभव विषयावर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील ब्रह्मदेव नवनाथ सरडे मार्गदर्शन, ऊस पिकातील सुधारित वाण व हंगामनिहाय पिक व्यवस्थापन याविषयावर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील मध्यवर्तीय ऊस संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त ऊस पैदासकार डॉ. भारत रासकर यांचे मार्गदर्शन तर राजाराम सूर्यवंशी यांचे फर्टीगेशन, ठिबक सिंचन संच देखभाल व आम्लप्रक्रिया विषयावर मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी ऊर्जा मिळताना दिसत असून कृषी महोत्सवात शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळताना दिसत आहे. हा महोत्सव राज्याला व जिल्ह्याला दिशादर्शक ठरताना दिसत आहे.

अटल भुजल योजनेचा स्टॉल लक्ष वेधणारा

अटल भुजल योजनेचा उद्देश भूजल कमी होण्याच्या समस्येचे निराकरण करणे आणि भारतातील शाश्वत भूजल व्यवस्थापनास प्रोत्साहन देणे हा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गंभीर पाणी टंचाईच्या समस्येचे निराकरण करणे आणि शाश्वत भूजल व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा आहे. यासंदर्भात कृषी महोत्सवात जनजागृती पर स्टॉल लावण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!