कोण जिंकणार लातूरचे ‘मैदान’ ? » लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान » चढत आहे तापमानाचा पारा, तरी प्रचंड उत्साह » मतदानासाठी वेळ काढा, जबाबदारी पार पाडा

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात लातूर लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे. निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार नशीब आजमावत असून सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ दरम्यान २ हजार १२५ मतदान केंद्रावर मतदान होईल. लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ७७ हजार ४२ इतके मतदार आहेत. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये विशेष उत्साह असल्याचे चित्र आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्या अगोदरपासूनच लातूरचे राजकीय वातावरण तापले होते, प्रचारादरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनीदेखील लातूर जिल्ह्यात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. याशिवाय सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला मतदाना दिवशी देखील उमेदवार व राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

मतदानासाठी मतदार खालील ओळखपत्रांपैकी कोणतेही ओळखपत्र घेऊन जाऊ शकतात

»मतदार ओळखपत्र

»पासपोर्ट, पॅन कार्ड

»आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

»केंद्र/राज्य सरकार/पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे

»बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक

»NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड

»मनरेगा जॉब कार्ड (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी)

»कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

»छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!