खुनाचा प्रयत्न करून फरार आरोपीस पिस्टलसह अटक ; जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

नांदेड / प्रतिनिधी : खूनाचा प्रयत्न करून पळून गेलेल्या आरोपीच्या नांदेड जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीला लालवाडी पुलाजवळून ताब्यात घेऊन जेरबंद केले. त्याचेकडून बेकायदेशीरीत्या बाळगलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक मोबाईल असा एकूण 30,000/-रुपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. अतिष विष्णु सुर्यवंशी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, भाग्यनगर पोलीस स्टेशनमधील दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व पोलीस अंमलदार माधव केंद्रे, गुंडेराव करले, दिपक पवार, किशन मुळे, देवा चव्हाण, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी, महिला पोलीस अंमलदार मेहजबीन शेख यांचे पथक घेत होते. यावेळी पथकाला गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी लालवाडी पुलाजवळ गावठी पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लालवाडी पुलाजवळून आरोपीला मोठया शिताफिने अटक केली. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कौतुक केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!