ग्रामीण भागात पारावर रंगू लागल्या निवडणुकीच्या चर्चा ; शहरी भागात डोअर टू डोअर प्रचार ; उमेदवारांचे एक एक राउंड पूर्ण ; बड्या नेत्यांच्या सभांना सुरुवात

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधि : लोकसभा निवडणुकीचे एका आठवड्यानंतर मतदान  होणार आहे. अशा परिस्थितीत लातूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांत सायंकाळी पारावरच्या गप्पांना उधाण आले आहे. शहरी भागात कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी डोअर टू डोअर प्रचारकार्यात गुंतले आहेत. जवळपास सर्वच गावांत सध्या निवडणुकीची चर्चा होताना दिसते. दिवसभर कडक ऊन असल्याने ग्रामीण भागातील वयस्क मंडळी गावातील मारोती मंदिराच्या पारावर एकत्र असते. सायंकाळी यात कामाच्या निमित्ताने तालुक्याला गेलेल्या किंवा शेतात कामे करून घरी परतलेल्या तरुणवर्गाचा समावेश असतो. पंधरा दिवसांपूर्वी शेत शिवार, पीकपाणी यावर होणाऱ्या संवादाची जागा आता तालुक्यातून कोणता उमेदवार लीड घेणार यावर येऊन ठेपली आहे.

विकासाची गती वाढणार का?

खासदार संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. केंद्र सरकारच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र नियमित योजना सोडून शहरी भागात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी निवडून येणाऱ्या खासदारांनी तालुका स्तरावर औद्योगिक वसाहत विकसित करण्याची मागणी होत आहे.

अपक्ष सरसावले ; युती, आघाडीतील उमेदवारांच्या
कार्यकर्त्यांना सूचना

■ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 28 उमेदवार आहेत. त्यातील ज्या उमेदवारांनी / राजकीय पक्षाने निवडणूक पूर्व काळात मतदार संघात  कार्यकर्ता टिकविण्याचा, जनमानस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी निवडणुक सोप्पी जाताना दिसत आहे. लातूर लोकसभा क्षेत्राचा आवाका मोठा असल्याने जिल्ह्यात प्रचाराला मोठी यंत्रणा लागते. त्यानुसार उमेदवार प्रचार करीत असून जिथे जाणे शक्य नाही तेथे घर परिवारातील व्यक्तींना पाठवले जात आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात आतापर्यंत कांही उमेदवारांनी प्रचारासाठी हजेरी लावली आहे. यासोबतच संवाद मेळावे, सभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांनी आपला प्रचार गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!