तडीपार आरोपीकडून बनावट चलनी नोटासह चोरीचे बारा वाहने जप्त ; हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी 

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

हिंजवडी / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ताब्यात घेतलेल्या तडीपार आरोपीकडून बनावट चलनी नोटा व चोरीची बारा वाहने हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जप्त केल्या आहेत.

अक्षय ऊर्फ सोन्या काळूराम हुलावळे (वय २९, रा. हुलावळे वस्ती,साखरे वस्ती, हिंजवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अक्षय याला २०/११/२०२३ पासून पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला, हिंजवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या. बनावट नोटांच्या गुन्ह्यात त्याच्या साथीदारांना यापूर्वीच अटक केलेली असून, त्यांच्याकडून या नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, शाई, कागद व साहित्य वाई जि. सातारा येथून जप्त केले आहे. तर या गुन्ह्यात अक्षय फरार होता. दरम्यान, अक्षय याच्यावर यापूर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून दहा दुचाकी व दोन रिक्षा अशी बारा चोरीची वाहने जप्त करण्यात आली. त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यातील आठ गुन्हे उघडकीस आले असून उर्वरित चार वाहनांचा तपास सुरु आहे. अक्षय हुलावळे हा सराईत असून, त्याच्यावर वाहनचोरीसह विविध कलमान्वये तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त बापु बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख, ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार ओमप्रकाश कांबळे, बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, सागर पंडीत यांच्या पथकाने केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!