नवीन म्हाडा सोसायटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती नवीन म्हाडा सोसायटी हरंगुळ बु. लातूर येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भगव्या ध्वजचे ध्वजरोहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांच्या हस्ते करण्यात येऊन महाराजांच्या पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ नेते शिवदास लखादिवे यांच्या हस्ते होऊन सामूहिक अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती समितीचे स्वागताध्यक्ष प्रमोद जोशी होते. सर्व जाती धर्मातील लोकांनी सलोख्याने आणि गुण्यागोविंदाने राहून महाराजांचे विचार अंगीकारले पाहिजे असे पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे म्‍हणाले. इतिहासात एकच राजा झाला ज्यांनी समतेच्या विचाराचा पुरस्कार केला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, संविधानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपतींचा समतेचा विचार घेतल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर पोलीस अंमलदार विशाल कोडे, जयंती समिती सचिव एकनाथ वडसकर, कार्याध्यक्ष ज्ञानोबा मनदुमले, संतोष सूर्यवंशी, पांडुरंग पवार, चंद्रकांत पुंड, पांचाळ, श्रीराम गड्डीमे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समितीचे अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी केले तर अमोल माळी यांनी आभार मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश देशपांडे, दत्ता काळे, मनोज कुलकर्णी, बजरंग जगताप, प्रसाद पुंड, आकाश येरमे, कृष्णा सूर्यवंशी, प्रथमेश पुंड, शिवाजी उगिले, चांदसाहेब शेख, अशोक येलाले, सुदर्शन सूर्यवंशी, श्रीरंग मादळे, रोहीत कांबळे, मुरलीधर घोडके, बालाजी भोसले आदिनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!