परवानाधारक क्लबमध्ये तिर्रट जुगाराचा खेळ, ७४ जणांवर गुन्हा, सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

निलंगा / प्रतिनिधी : परवानाधारक क्लबच्या नावाखाली राजरोस सुरु असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी छापा टाकून ७४ जणांना रंगेहाथ पकडले. १२ मे रोजी रात्री १ वाजता निलंगा तालुक्यातील मौजे तांबाळा शिवारातील एका शेतामध्ये चालणाऱ्या परवानाधारक क्लबमध्ये ही कारवाई केली. यावेळी रोख ६ लाख १५० रुपये, २९ चार चाकी वाहने अंदाजे किंमत २ कोटी १९ लाख रुपये, जुगार साहित्य व ७० मोबाइल अंदाजे किमत ३ लाख ७३ हजार रुपये असा एकूण २ कोटी २८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वात औराद शहाजनी पोलीस ठाणे व चाकूर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!