बस्तापुरे नगरात चोरट्यांचा पैस्यावर डल्ला

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : घराचा कडी कोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडाच्या कपाटातील लक्ष्मीपूजेचे रोख ८ हजार रूपये, चांदीचे अंदाजे १० तोळे वजनाचे साहित्य अंदाजे किंमत ७ हजार रुपये, सोन्याच्या पॉलीश केलेल्या ८ बांगडया किंमत अंदाजे १ हजार रुपये, पिशवीमध्ये ठेवलेले केशरी रेशनकार्ड, वरील चांदीच्या वस्तूच्या पावत्या असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना लातूर शहरातील बस्तापुरे नगर येथे १६ ते १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दरम्यान घडली असून याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर तुळशीराम सुरकुटे वय ६३ रा. बस्तापुरे नगर लातूर यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वांगे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!