बारावीचा निकाल आज ; या संकेतस्थळावरून पाहता येणार निकाल 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, २१ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची मुद्रित प्रत घेता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. कांही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि सीआयसीएसईतर्फे बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले होते त्यामुळे राज्य मंडळ कधी निकाल जाहीर करणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून आज विविध संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

advertisement
                         Advertisement

उपयुक्त संकेतस्थळे

१. mahresult.nic.in

२. mahahsscboard.in

गुणपडताळणी, छायाप्रतीबाबत…

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी व छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जून २०२४ या कालावधीत अर्ज करायचा आहे. पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!