मोदींच्या कसोटीवर उतरलेला उच्चशिक्षित कार्यकर्ता ; अॅड. दिग्विजय काथवटे

6 Min Read

भाजपसारख्या केडर – बेस्ड (प्रशिक्षित आणि समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते) पक्षामध्ये दोन पद्धतीची रचना आढळते. पडद्यासमोर दिसणारे नेते आणि पडद्याआड राहून संघटनात्मक काम करणारे कार्यकर्ते, संघटक, पदाधिकारी आदी. पक्षाच्या ध्येयधोरणांची आखणी, नेतृत्वाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमांची चोख अंमलबजावणी, पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षातील सहकार्यांना आत्मविश्वास व बळ देण्यासारखे असंख्य कामे कार्यकर्ते, संघटक, पदाधिकाऱ्यांना करावे लागते. ही अशी कामे करणाऱ्यामध्ये एक प्रभावी नाव आहे अॅड.दिग्विजय काथवटे यांचं. भाजपसारख्या केडर – बेस्ड पक्षात शिस्तीला महत्व आहेच. ती पाळणाऱ्याचं कौतुक ही केल जातं. त्याच उत्तम उदाहरण म्हणून पुन्हा एकदा अॅड. दिग्विजय काथवटे यांचंच नाव घ्यावं लागतं. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्वत्र भाजपाची ख्याती आहे. अशावेळी पक्षसंघटनेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. अशा उत्साहाला आणि आत्मविश्वासाला योग्य दिशा मिळाली, तर बरंच कांही चांगल घडू शकत. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर विचारपूर्वक काम करणारे सजग पदाधिकाऱ्यांना विविध संधी दिल्यास ते त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. कदाचित असाच विचार करून भारतीय जनता पक्षात त्यांच्या कामाची तडफ व उमज पाहून त्यांना संघटनेत लातूर शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मराठवाडा संयोजक, लातूर धाराशिव संवाद केंद्राचे लोकसभा संयोजक, भाजपा लातूर शहर मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे सहसंयोजक, सेवा पंधरवाडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर याचे संयोजक, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे संयोजक, हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीचे संयोजक अशा अनेक दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलली आहे. लातूर राखीव लोकसभा मतदारसंघांसाठी उच्चशिक्षित असलेल्या असलेल्या अॅड.दिग्विजय काथवटे यांच्या नावाची चर्चा आहे. यानिमित्ताने त्यांनी पडद्याआड राहून केलेल्या संघटनात्मक कार्यकर्तृत्वाचा दैनिक मुखपत्र दक्षताने घेतलेला आढावा.

 

Contents
भाजपसारख्या केडर – बेस्ड (प्रशिक्षित आणि समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते) पक्षामध्ये दोन पद्धतीची रचना आढळते. पडद्यासमोर दिसणारे नेते आणि पडद्याआड राहून संघटनात्मक काम करणारे कार्यकर्ते, संघटक, पदाधिकारी आदी. पक्षाच्या ध्येयधोरणांची आखणी, नेतृत्वाने निर्धारित केलेल्या कार्यक्रमांची चोख अंमलबजावणी, पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षातील सहकार्यांना आत्मविश्वास व बळ देण्यासारखे असंख्य कामे कार्यकर्ते, संघटक, पदाधिकाऱ्यांना करावे लागते. ही अशी कामे करणाऱ्यामध्ये एक प्रभावी नाव आहे अॅड.दिग्विजय काथवटे यांचं. भाजपसारख्या केडर – बेस्ड पक्षात शिस्तीला महत्व आहेच. ती पाळणाऱ्याचं कौतुक ही केल जातं. त्याच उत्तम उदाहरण म्हणून पुन्हा एकदा अॅड. दिग्विजय काथवटे यांचंच नाव घ्यावं लागतं. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्वत्र भाजपाची ख्याती आहे. अशावेळी पक्षसंघटनेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. अशा उत्साहाला आणि आत्मविश्वासाला योग्य दिशा मिळाली, तर बरंच कांही चांगल घडू शकत. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर विचारपूर्वक काम करणारे सजग पदाधिकाऱ्यांना विविध संधी दिल्यास ते त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. कदाचित असाच विचार करून भारतीय जनता पक्षात त्यांच्या कामाची तडफ व उमज पाहून त्यांना संघटनेत लातूर शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मराठवाडा संयोजक, लातूर धाराशिव संवाद केंद्राचे लोकसभा संयोजक, भाजपा लातूर शहर मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे सहसंयोजक, सेवा पंधरवाडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर याचे संयोजक, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे संयोजक, हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीचे संयोजक अशा अनेक दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलली आहे. लातूर राखीव लोकसभा मतदारसंघांसाठी उच्चशिक्षित असलेल्या असलेल्या अॅड.दिग्विजय काथवटे यांच्या नावाची चर्चा आहे. यानिमित्ताने त्यांनी पडद्याआड राहून केलेल्या संघटनात्मक कार्यकर्तृत्वाचा दैनिक मुखपत्र दक्षताने घेतलेला आढावा.| मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर : राज्यात काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून लातूरकडे पाहिले जाते. आतापर्यंत मागील १५ पैकी ११ वेळा लोकसभेच नेतृत्व हे काँग्रेसकडे होते. उच्चशिक्षित असलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी तब्बल ७ वेळा लातूर लोकसभा मतदार संघांचे नेतृत्व केले आहे. मात्र २००४ साली रूपाताई पाटील निलंगेकरांच्या रूपानं भाजपला दिग्गज उमेदवार मिळाला. शिवराज पाटील चाकूरकर यांच्यापुढे त्यांनी मोठं आव्हान उभं केलं. रूपाताई पाटील निलंगेकर यांनी ४ लाख ४ हजार ५०० मतं घेत विजय मिळवला. तर शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख ७३ हजार ६०९ मतं मिळाली. शिवराज पाटील चाकूरकर यांचा हा लोकसभेतला हा पहिला पराभव ठरला. भाजपनं लोकसभेची जागा ही २००४ नंतर २०१४ ला जिंकली होती. २०१४ साली मोदी लाटेत भाजपाचे उच्चशिक्षित असलेले डॉ. सुनिल गायकवाड यांचा विजय झाला होता. पण धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पक्षाकडून २०१९ साली डॉ. गायकवाडांना धक्का दिला आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य असलेले सुधाकर शृंगारे यांना लोकसभेला संधी दिली. २०१९ ला भाजपाचे सुधाकर शृंगारे यांचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये लातूरची जागा, पर्यायाने खासदार सुधाकर शृंगारे यांची जागा डेंजर झोनमध्ये होते. अशावेळी लोकसभा उमेदवारी संदर्भातही वेगळा विचार केला जाऊ शकतो. कांही महिन्यापूर्वी ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत “मोदी की गॅरंटी” ह्या तीन शब्दांनी सर्वसामान्य भारतीयांवर मोठीच जादू केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची हमी म्हणजे सगळं काही नामी, हे तमाम देशवासी जाणून आहेत. पंतप्रधान असलेल्या श्री. मोदी ह्यांची खरी ओळख आहे, ती बिनीचा कार्यकर्ता ! तेही स्वतःला जनतेचा सेवक असंच अभिमानाने सांगतात. चांगला कार्यकर्ता कसा असतो ? तो कसा असावा ? याबाबत खुद्द श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी उत्तम कार्यकर्त्याची चार लक्षणे सांगितली आहेत. ‘पग में चक्कर, जीभ में शक्कर, सर पे बरफ और दिल में हाम. म्हणजे श्री. मोदी सांगतात की, कार्यकर्त्याने सतत सक्रिय असावे, फिरते राहावे, संवाद साधताना कडवटपणा टाळून चांगलं बोलावं, डोके शांत ठेवून दिलेली जबाबदारी पार पाडावी आणि मनात नेहमी हिंमत असावी! पंतप्रधानांनी सांगितलेल्या उत्तम कार्यकर्त्याच्या कसोटीवर उतरणारे व्यक्तिमत्त्व भारतीय जनता पक्षाच्या लातूर शाखेला लाभले आहे. ते म्हणजे अॅड.दिग्विजय काथवटे! मोदींनी सांगितलेली चारही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसतात, त्या शिवाय अन्य अनेक गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळून येतात. त्यामुळेच पक्षाकडून त्यांच्यावर संघटनेत लातूर शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यानंतर त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मराठवाडा संयोजक, लातूर धाराशिव संवाद केंद्राचे लोकसभा संयोजक, भाजपा लातूर शहर मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे सहसंयोजक, सेवा पंधरवाडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर याचे संयोजक, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे संयोजक, हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीचे संयोजक अशा सातत्याने विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत. लोकसभेच्या येत्या निवडणुकीत सत्तारूढ भाजप हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहे. कागदावरचं नियोजन कितीही चांगलं आणि परिपूर्ण असलं, तरी केवळ त्याचाच उपयोग नसतो. आखलेल्या नियोजनाची तेवढीच चोख अंमलबजावणी होणं महत्त्वाचं. ती जबाबदारी पेलणारा माणूस अष्टावधानी, बुद्धिमान, संघटनेची बारकाईनं माहिती असणारा असावा लागतो. अॅड. काथवटे यांच्याकडे संघटनेची बारकाईनं माहिती असून विविध जयंती उत्सवात जन माणसात मिसळणारा सर्वांच्या सुख दुःखात १२ महिने २४ तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून ही त्यांची ओळख असणे ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यातच विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हे लोकसभेचा उमेदवार मीच, असे सांगत प्रचाराला लागले आहेत, पण धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पक्षाकडून शृंगारेनांच धक्का दिला जातो का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : राज्यात काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून लातूरकडे पाहिले जाते. आतापर्यंत मागील १५ पैकी ११ वेळा लोकसभेच नेतृत्व हे काँग्रेसकडे होते. उच्चशिक्षित असलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी तब्बल ७ वेळा लातूर लोकसभा मतदार संघांचे नेतृत्व केले आहे. मात्र २००४ साली रूपाताई पाटील निलंगेकरांच्या रूपानं भाजपला दिग्गज उमेदवार मिळाला. शिवराज पाटील चाकूरकर यांच्यापुढे त्यांनी मोठं आव्हान उभं केलं. रूपाताई पाटील निलंगेकर यांनी ४ लाख ४ हजार ५०० मतं घेत विजय मिळवला. तर शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख ७३ हजार ६०९ मतं मिळाली. शिवराज पाटील चाकूरकर यांचा हा लोकसभेतला हा पहिला पराभव ठरला. भाजपनं लोकसभेची जागा ही २००४ नंतर २०१४ ला जिंकली होती. २०१४ साली मोदी लाटेत भाजपाचे उच्चशिक्षित असलेले डॉ. सुनिल गायकवाड यांचा विजय झाला होता. पण धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पक्षाकडून २०१९ साली डॉ. गायकवाडांना धक्का दिला आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य असलेले सुधाकर शृंगारे यांना लोकसभेला संधी दिली. २०१९ ला भाजपाचे सुधाकर शृंगारे यांचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये लातूरची जागा, पर्यायाने खासदार सुधाकर शृंगारे यांची जागा डेंजर झोनमध्ये होते. अशावेळी लोकसभा उमेदवारी संदर्भातही वेगळा विचार केला जाऊ शकतो. कांही महिन्यापूर्वी ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत “मोदी की गॅरंटी” ह्या तीन शब्दांनी सर्वसामान्य भारतीयांवर मोठीच जादू केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची हमी म्हणजे सगळं काही नामी, हे तमाम देशवासी जाणून आहेत. पंतप्रधान असलेल्या श्री. मोदी ह्यांची खरी ओळख आहे, ती बिनीचा कार्यकर्ता ! तेही स्वतःला जनतेचा सेवक असंच अभिमानाने सांगतात. चांगला कार्यकर्ता कसा असतो ? तो कसा असावा ? याबाबत खुद्द श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी उत्तम कार्यकर्त्याची चार लक्षणे सांगितली आहेत. ‘पग में चक्कर, जीभ में शक्कर, सर पे बरफ और दिल में हाम. म्हणजे श्री. मोदी सांगतात की, कार्यकर्त्याने सतत सक्रिय असावे, फिरते राहावे, संवाद साधताना कडवटपणा टाळून चांगलं बोलावं, डोके शांत ठेवून दिलेली जबाबदारी पार पाडावी आणि मनात नेहमी हिंमत असावी! पंतप्रधानांनी सांगितलेल्या उत्तम कार्यकर्त्याच्या कसोटीवर उतरणारे व्यक्तिमत्त्व भारतीय जनता पक्षाच्या लातूर शाखेला लाभले आहे. ते म्हणजे अॅड.दिग्विजय काथवटे! मोदींनी सांगितलेली चारही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसतात, त्या शिवाय अन्य अनेक गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळून येतात. त्यामुळेच पक्षाकडून त्यांच्यावर संघटनेत लातूर शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यानंतर त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मराठवाडा संयोजक, लातूर धाराशिव संवाद केंद्राचे लोकसभा संयोजक, भाजपा लातूर शहर मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे सहसंयोजक, सेवा पंधरवाडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर याचे संयोजक, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे संयोजक, हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीचे संयोजक अशा सातत्याने विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत. लोकसभेच्या येत्या निवडणुकीत सत्तारूढ भाजप हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहे. कागदावरचं नियोजन कितीही चांगलं आणि परिपूर्ण असलं, तरी केवळ त्याचाच उपयोग नसतो. आखलेल्या नियोजनाची तेवढीच चोख अंमलबजावणी होणं महत्त्वाचं. ती जबाबदारी पेलणारा माणूस अष्टावधानी, बुद्धिमान, संघटनेची बारकाईनं माहिती असणारा असावा लागतो. अॅड. काथवटे यांच्याकडे संघटनेची बारकाईनं माहिती असून विविध जयंती उत्सवात जन माणसात मिसळणारा सर्वांच्या सुख दुःखात १२ महिने २४ तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणून ही त्यांची ओळख असणे ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यातच विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हे लोकसभेचा उमेदवार मीच, असे सांगत प्रचाराला लागले आहेत, पण धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पक्षाकडून शृंगारेनांच धक्का दिला जातो का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!