राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर लवकरच अटकेच्या कारवाईची शक्यता ; ठेवीदारांच्या तक्रारीचा ओघ वाढला ; फसवणुकीचा आकडा दहा कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता

2 Min Read

ठेवीदारांचा स्थानिक सल्लागार-संचालकांवर रोष

राजस्थानी मल्टीस्टेटच्या पदाधिकारी, स्थानिक सल्लागार/ संचालक यांनी प्रत्यक्ष भेटून आकर्षक मुदत ठेव ठेवल्यास आकर्षक व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखविले. प्रत्यक्ष भेटून, गुंतवणूक करायला लावली असून आता हात वरी करत असल्याचा आरोप ठेवीदार करत आहेत.

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : राजस्थानी मल्टीस्टेट बँकेची व्याप्ती राज्यभर आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. लातूरच्या मार्केट यार्ड परिसरात या बँकेची शाखा आहे. कांही दिवसापूर्वी ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक आणि स्थानिकचे सर्व संचालक अशा २३ जणांविरुद्ध फसवणूक व ईतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, जास्त व्याजदराचं प्रलोभन दाखवून राजस्थानी मल्टीस्टेटनं ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या. बँकेचे अध्यक्ष आणि संचालक, स्थानिक संचालक असणाऱ्यानी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या. त्यानंतर इतर ठिकाणी यामधील काही पैसा खर्च केला. यासह विविध ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला. जेव्हा ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपल्या. त्यावेळी बँकेकडे ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यास पैसेच नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठेवीदारांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, अशी उत्तरं देऊन धुडकावून लावलं जात होतं. पण सातत्यानं अशीच उत्तरं मिळत असल्यामुळे अखेर ठेवीदारांच्या तक्रारीवरुन बँकेच्या अध्यक्ष आणि बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर भादंवी ४०६, ४२०, ४०९, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम ३ अन्वये गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधी चौक पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. ठेवीदारांच्या तक्रारीचा ओघ वाढला असून फसवणुकीचा आकडा दहा कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर लवकरच अटकेच्या कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!