लाच स्वीकारताना ग्रामसेवकास अटक

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

नांदेड / प्रतिनिधी : जिल्ह्यातील मौ. चिखली, ता.किनवट, जि.नांदेड येथील खरेदी केलेली मोकळी जागा (प्लॉट) ग्रामपंचायत चिखली येथील 8 अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना चिखली येथील ग्रामसेवकास नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

याबाबत सविस्तर वृत असे की, तक्रारदार यांनी मौ. चिखली, ता.किनवट, जि.नांदेड येथील शेत सर्वे नं. 118/2 मधील खरेदी केलेली मोकळी जागा (प्लॉट) ग्रामपंचायत चिखली येथील 8 अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे, ग्रामपंचायत मांडवी अतिरिक्त पदभार ग्रामपंचायत चिखली यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदाराचे सदरचे शासकीय कामासाठी तक्रारदार यांना रूपये 5,000/- ची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड पथकाने तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर आलोसे प्रेमसिंग आडे याने लाचेची रक्कम रूपये 5,000/- स्वतःचे राहते घरी गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड येथे स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली.

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतनांदेड / प्रतिनिधी : जिल्ह्यातील मौ. चिखली, ता.किनवट, जि.नांदेड येथील खरेदी केलेली मोकळी जागा (प्लॉट) ग्रामपंचायत चिखली येथील 8 अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना चिखली येथील ग्रामसेवकास नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.याबाबत सविस्तर वृत असे की, तक्रारदार यांनी मौ. चिखली, ता.किनवट, जि.नांदेड येथील शेत सर्वे नं. 118/2 मधील खरेदी केलेली मोकळी जागा (प्लॉट) ग्रामपंचायत चिखली येथील 8 अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे, ग्रामपंचायत मांडवी अतिरिक्त पदभार ग्रामपंचायत चिखली यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदाराचे सदरचे शासकीय कामासाठी तक्रारदार यांना रूपये 5,000/- ची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड पथकाने तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर आलोसे प्रेमसिंग आडे याने लाचेची रक्कम रूपये 5,000/- स्वतःचे राहते घरी गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड येथे स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!