लातुरात २८ मे रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संगाचे आयोजन

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर /प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्यावतीने लातुरात महासत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (ता. २८) सायंकाळी पाच वाजता लातूर येथील नवीन कलेक्टर ऑफिसच्या समोर, ग्रँड हॉटेलच्या पाठीमागे, बार्शी रोड येथे हा सोहळा होणार आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गेल्या सात दशकांपासून मानव कल्याणासाठी योगदान देत आहे. सेवा कार्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानांतर्गत अठरा विभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे, सेवामार्गातील १८ विभागांचे मार्गदर्शन या महासत्संग सोहळ्यात दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे हे करणार आहेत. यावेळी मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, नामांकित डॉक्टरांचे पथक तपासणी करणार आहेत. आयोजित वधू-वर नोंदणी व परिचय मेळाव्याचा  विवाह इच्छुक युवक-युवतींना लाभ होणार आहे. आदर्श राष्ट्र घडवण्याच्या या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून महासत्संग सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन मराठवाडा स्तरीय महासत्संग सोहळा आयोजन समिती, लातूर च्या वतीने करण्यात आले आहे.

महासत्संग सोहळ्यातील अत्यंत प्रभावी विनामुल्य सेवा

* मानवी जीवनातील उत्पन्न होणाऱ्या विविध समस्यांवर श्री स्वामी समर्थ सेवा उपासना व प्रश्नोत्तर कार्यक्रमाव्दारे विनामुल्य मार्गदर्शन लाभेल

* विवाह संस्कार विभाग अंतर्गत सर्व जाती, धर्मीय वधु-वर विवाह नांव नोंदणी व मार्गदर्शन

* स्वयंरोजगार विभाग- अंतर्गत विविध मल्टीनॅशनल व स्थानिक कंपन्यामध्ये विविध पदांसाठी नौकरीसाठी आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन

* कॅन्सर, बी.पी., शुगर ई. सर्व प्रकारच्या आजारांवर आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय

* व्यसनमुक्त जीवनासाठी प्रभावी उपाय

* वास्तूशास्त्रानुसार आदर्श वास्तू रचना कशी असावी यावर मार्गदर्शन, वास्तूदोष निवारण उपाय योजना

* कर्जबाजारीपणा, सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर रामबाण उपाय

* शेतकऱ्यांसाठी विषमुक्त, सात्विक आणि सेंद्रिय शेती यावर परखड मार्गदर्शन व उपाय

* दुष्काळ निवारण विशेष उपक्रम, उपाय व पर्जन्यवृष्टी साठी उपाय योजना व सेवा

* बालसंस्कार, शिशुसंस्कार, गर्भसंस्कार, संतती, युवासंस्कार यासारख्या अनेक विषयांवर अमुल्य मार्गदर्शन

* पर्यावरण पुरक सणवारांची विशेष मांडणी माहिती, मार्गदर्शन व शंका समाधान

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!