लातूर जिल्हा वकील मंडळाच्या चुरशीच्या लढतीतून २०२४ नूतन कार्यकारिणी जाहीर

2 Min Read

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाची नूतन कार्यकारिणी २०२४ जाहीर करण्यात आली आहे. दोन पॅनल मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत विजयी झालेले उमेदवार अध्यक्ष ॲड. शरद इंगळे ५७३, उपाध्यक्ष ॲड. आनंद खांडेकर ३८३, सचिव ॲड. प्रदिपसिंह तुळशीदास गंगणे यांनी ५६४ मते घेत सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत तर सहसचिव ॲड. नरेश कुलकर्णी ५९१, ग्रंथालय सचिव ॲड. विजय साबळे ६८८, कोषाध्यक्ष ॲड. रोहित सोमवंशी ७२१ मते घेऊन विजयी झाले आहेत तर दुसऱ्यांदा महीलाची निवडणूक बिनविरोध न होता अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महीला उपाध्यक्ष ॲड. मनिषा दिवे पाटील ५९८ , महीला सहसचिव ॲड. तृप्ती इटकरी ६२५ मते घेवुन विजयी झाले आहेत. मतदान प्रक्रिया दिनांक १०.०४.२०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडली, एकूण मतदार म्हणुन १५२२ जणांची अधिकृत मतदान नोंदणी होती त्यापैकी १२२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदान मोजणी मध्यरात्री पर्यंत चालली निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विजयकुमार सलगरे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ॲड. संजय सितापुरे, ॲड. किरण चिंते पाटील, ॲड. मेघा पाटणकर, ॲड. नयना देवताळकर, ॲड. प्रशांत मरळे, ॲड. हर्षला जोशी, ॲड. डॉ.अजित चिखलीकर, ॲड. युसुफ पटेल, ॲड. विश्वदीप कोटलवार, ॲड. संतोष वाघमारे यांनी काम पाहिले आहे तर त्यांना कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मसलगे, सुशील सुरवसे, विष्णु जाधव यांनी सहाय्य केले तर सर्व नूतन पदाधिकारी यांचा पुष्पहार घालून करून पेढा भरवुन मावळत्या कार्यकारिणीने स्वागत केले आहे. अति उच्च उज्वल परंपरा असलेल्या लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सर्व ज्येष्ठ विधीज्ञ, सहकारी विधीज्ञ मित्रांनी सलग दुसऱ्यांदा वकील मंडळाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मनस्वी ऋण व्यक्त केले आहे.

» मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाची नूतन कार्यकारिणी २०२४ जाहीर करण्यात आली आहे. दोन पॅनल मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत विजयी झालेले उमेदवार अध्यक्ष ॲड. शरद इंगळे ५७३, उपाध्यक्ष ॲड. आनंद खांडेकर ३८३, सचिव ॲड. प्रदिपसिंह तुळशीदास गंगणे यांनी ५६४ मते घेत सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत तर सहसचिव ॲड. नरेश कुलकर्णी ५९१, ग्रंथालय सचिव ॲड. विजय साबळे ६८८, कोषाध्यक्ष ॲड. रोहित सोमवंशी ७२१ मते घेऊन विजयी झाले आहेत तर दुसऱ्यांदा महीलाची निवडणूक बिनविरोध न होता अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महीला उपाध्यक्ष ॲड. मनिषा दिवे पाटील ५९८ , महीला सहसचिव ॲड. तृप्ती इटकरी ६२५ मते घेवुन विजयी झाले आहेत. मतदान प्रक्रिया दिनांक १०.०४.२०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडली, एकूण मतदार म्हणुन १५२२ जणांची अधिकृत मतदान नोंदणी होती त्यापैकी १२२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदान मोजणी मध्यरात्री पर्यंत चालली निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विजयकुमार सलगरे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ॲड. संजय सितापुरे, ॲड. किरण चिंते पाटील, ॲड. मेघा पाटणकर, ॲड. नयना देवताळकर, ॲड. प्रशांत मरळे, ॲड. हर्षला जोशी, ॲड. डॉ.अजित चिखलीकर, ॲड. युसुफ पटेल, ॲड. विश्वदीप कोटलवार, ॲड. संतोष वाघमारे यांनी काम पाहिले आहे तर त्यांना कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मसलगे, सुशील सुरवसे, विष्णु जाधव यांनी सहाय्य केले तर सर्व नूतन पदाधिकारी यांचा पुष्पहार घालून करून पेढा भरवुन मावळत्या कार्यकारिणीने स्वागत केले आहे. अति उच्च उज्वल परंपरा असलेल्या लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सर्व ज्येष्ठ विधीज्ञ, सहकारी विधीज्ञ मित्रांनी सलग दुसऱ्यांदा वकील मंडळाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मनस्वी ऋण व्यक्त केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!