विद्यार्थ्यांच्या समस्याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यापीठ प्रशासनाला साकडे

2 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर / प्रतिनिधी : आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगराच्या वतीने विद्यापीठातील विविध समस्या बाबत अभाविपने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले आहे. लातूर शहरातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्या मार्फत तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र पेठ येथील संचालक राजेश शिंदे यांच्या मार्फत कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. यामध्ये विद्यार्थी परिषदेने प्रामुख्याने तीन मागण्या या मध्ये केल्या आहेत.

सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने चालू सत्राचे शैक्षणीक परीक्षा शुल्क व आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 चे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे.ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन चे फॉर्म भरले आहेत पुनर्मूल्यांकनाचा निकाल येत्या 15 दिवसाच्या आत निकाल लावावे. पुनर्मूल्यांकना मध्ये ज्या विद्यार्थ्याचे गुणांमध्ये बदल झाला अश्या विद्यार्थ्याचे पुनर्मूल्यांकनाचे शुल्क परत करण्यात यावे. अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी अभाविप महानगरमंत्री सुशांत एकोर्गे असे म्हणाले विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुनर्मूल्यांकन व फेरपरीक्षा याचे फॉर्म एकदाच भरून घेतले जात आहेत पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर लावून मगच फेरपरीक्षा फॉर्म भरून घेतले जावे व विद्यार्थ्याची आर्थिक लूट विद्यापीठाने करू नये.” सदरील मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्याच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे त्यांनी दिला. यावेळी पश्चिम नगर मंत्री सागर वाडीकर, सहमंत्री तेजुमई राऊत, अभिजित बोरोळे, चैत्यन चेलकर, नागेश पाटील, प्रवीण शिंदे, राम जाधव, अक्षय स्वामी व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!