विधी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेसचे आयोजन; लातूर जिल्हा वकील मंडळाचा स्तुत्य उपक्रम

1 Min Read

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, सहाय्यक सरकारी अभियोक्ता आदी विधी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेस चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ॲड. विशाल दीक्षित, लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड.शरद इंगळे, उपाध्यक्ष ॲड. आनंद खांडेकर, उपाध्यक्ष ॲड. मनीषा दिव्ये पाटील, सचिव ॲड. प्रदीपसिंह गंगणे, सहसचिव ॲड. नरेश कुलकर्णी, ॲड. तृप्ती इटकरी, ग्रंथालय सचिव ॲड.विजय साबळे, कोषाध्यक्ष ॲड. रोहित सोमवंशी, वुमन्स फेडरेशनच्या अध्यक्ष ॲड. जयश्री पाटील, ॲड. किरण चिंते, ॲड. राजेंद्र लातूरकर यांच्यासह मोठया संख्येने वकील बांधवांची उपस्थिती होती

कार्यक्रमांचे प्रास्ताविक लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲड. प्रदिपसिंह गंगणे यांनी तर सुत्रसंचालन ॲड. मनिषा दिवे पाटील, अँड नरेश कुलकर्णी, यांनी केले, आभार ॲड. रोहित सोमवंशी यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!