६० गावातील अंतर्गत रस्त्याच्या ८२ कामासाठी आ.कराड यांच्या प्रयत्नातून ८ कोटी निधी मंजूर

4 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात असलेल्या ६० गावात अंतर्गत रस्त्याच्या ८२ कामासाठी भाजपाचे नेते आ.रमेश कराड यांच्या प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तब्बल ८ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने त्या त्या गावातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आ. कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात वाडी वस्तीत शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी मतदार संघातील विविध गावात अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा याकरीता राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. लातूर जिल्ह्यातील गावांतर्गत रस्त्याच्या ४०५ कामांना २२ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. आ.रमेश कराड यांच्या पाठपुराव्यामुळे लातूर ग्रामीण मतदार संघातील ६० गावातील ८२ कामांना तब्बल ८ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्यात लातूर तालुक्यातील २९ गावातील ४५ कामासाठी ४ कोटी ९५ लक्ष रुपयांचा रेणापूर तालुक्यातील २२ गावातील २४ कामासाठी १ कोटी ९५ लक्ष रुपयांचा तर औसा तालुक्यातील भादा सर्कल मध्ये येणाऱ्या ९ गावातील १३ कामाकरिता एक कोटी दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या निधीतून त्या त्या गावात सिमेंट रस्त्याची आणि पेव्हर ब्लॉकचे रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. लातूर ग्रामीण मतदार संघातील रस्त्याची कामे मंजूर झालेल्या गावात लातूर तालुका – बोकनगाव दोन ३० लक्ष , मळवटी १५ लक्ष, बिंदगीहाळ दोन कामे ३० लक्ष, मुरुड अकोला सहा कामे ५५ लक्ष, ३० लक्ष, खुलगापूर तीन कामे ३० लक्ष, बोरगाव बु. दोन कामे ३०, मळवटी १५ लक्ष, भिसे वाघोली तीन कामे ३० लक्ष, चिंचोली ब. दोन कामे ३५ लक्ष, नागझरी ३० लक्ष, टाकळी ब. ३० लक्ष, सावरगाव दोन २५ लक्ष, चिंचोलीराव ५ लक्ष, दिंडेगाव ५ लक्ष,भोईसमुद्रगा ५ लक्ष, माटेफळ ५ लक्ष, खुंटेफळ ५ लक्ष, सामनगाव ५ लक्ष, निवळी ५ लक्ष, हिसोरी ५ लक्ष, भातांगळी ५ लक्ष, गातेगाव ५ लक्ष, बामणी ५ लक्ष, भडी ५ लक्ष, गांजूर ५ लक्ष, सलगरा बु. दोन कामे २५ लक्ष, सलगरा खु ५ लक्ष, कोळपा ५ लक्ष, गाधवड १० लक्ष, रेणापूर तालुका – रामवाडी पा. १० लक्ष, कामखेडा २० लक्ष, रामवाडी तीन कामे ख. २५ लक्ष, आनंदवाडी ५ लक्ष, मोहगाव ५ लक्ष, नरवटवाडी ५ लक्ष, कोष्‍टगाव ५ लक्ष, गोढाळा ५ लक्ष, भोकरंबा ५ लक्ष, मोरवड ५ लक्ष, मोटेगाव ५ लक्ष, वाला ५ लक्ष, दर्जी बोरगाव ५ लक्ष, सांगवी ५ लक्ष, घनसरगाव ५ लक्ष, फरदपूर ५ लक्ष, डि. देशमुख ५ लक्ष, वंजारवाडी ५ लक्ष, इंदरठाणा ५ लक्ष, पानगाव २० लक्ष, गव्‍हाण २० लक्ष, लखमापूर २० लक्ष, आणि औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील भेटा दोन कामे ३० लक्ष, भादा ५ लक्ष, कवठा केज ५ लक्ष, सत्‍तरधरवाडी ५ लक्ष, सिंदाळवाडी ५ लक्ष, वडजी ५ लक्ष, वानवडा ५ लक्ष, काळमाथा तीन कामे ३० लक्ष, रिंगणी (गुळखेडा) दोन कामे २० लक्ष याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे. गेल्या काही दिवसापासून मतदार संघातील अनेक गावात विविध विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने आणि ६० गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाल्याने भाजपाचे नेते आ. रमेश कराड यांचे त्या त्या गावातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!