वलांडी गुन्हयातील आरोपीस फाशीची शिक्षा द्या ;  पिंपरी-चिंचवड हिंदु खाटीक समाजाच्या वतीने पोलीस आयुक्ताकडे मागणी

2 Min Read

पिंपरी / सुनिल कांबळे : लातूर जिल्ह्यातील मौजे वलांडी येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलींवर निर्दयी आरोपीने अत्याचार केला आहे. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ४,६ अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली असून सदरील आरोपीला फाशी ची शिक्षा देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड हिंदु खाटीक समाजाच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चौक येथे जनआक्रोश निदर्शने आंदोलन करून निषेध व्यक्त करुन पोलीस आयुक्ताकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पिडीत कुटुंबात वयोवृध्द आजाराने ग्रस्त सासु, सासरे, एक विधवा महीला व त्यांच्या ४ लहान मुली, एक लहान मुलगा असा परिवार असून सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह पीडितेच्या विधवा आईवरच आहे, जी मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागविते. त्यामुळे आरोपी व आरोपीच्या कुटूंबियाकडून पिडीत कुटूंबावर दबाव आणण्याची शक्यता टाळता येत नाही. पिडीत व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे. पीडित कुटुंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी. पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा. सदरचे प्रकरण फास्ट ट्रैक न्यायालयात चालवावे व आरोपीस फाशी देण्यात यावी. पिडीत कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजने अंतर्गत (स्पेशल केस खाली) मदत देण्यात यावी. संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गाव बंदी करण्यात यावी. जेणेकरून गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!