ना.संजय बनसोडे यांनी पीडित कुटुंबियांची घेतली भेट ; शासकीय मदतीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

1 Min Read

लातूर : देवणी तालुक्यातील पीडित कुटुंबियांची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी भेट घेतली. तसेच कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ना. बनसोडे आणि खासदार सुधाकर शृंगारे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना ना. बनसोडे यांनी दिल्या. निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झडके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, देवणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक डोके यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!