प्रतिकात्मक छायाचित्र
पुणे : जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमचे कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) हे ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान चोरीला गेल्याचे निदर्शनास आले असून यानुषंगाने निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील चौकशी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिध्दीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षा कक्षात योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. दिवसभरात प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो. तरीही अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.