कोल्हापूर : शहरातील आण्णा चेंबूरी असे टोपणनाव असलेला इसम बेकायदेशीररित्या गावठी कट्ठाजवळ बाळगून इन्टाग्रामवर दहशत माजवत असून तो राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील चुनेकर शाळेजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने दि.०७/०२/२०२४ रोजी राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील चुनेकर शाळेजवळ चौकामध्ये मोठया शिताफीने इन्टाग्राम अकाऊटमधील रिल्स फोटोमध्ये वर्णनाचा इसम संशयितरित्या ताब्यात घेवून त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव प्रसाद राजाराम कलकुटकी उर्फ आण्णा चेंबुरी वय २१ वर्ष, व्यवसाय फेब्रिकेशन रा.तीन बत्ती चौक दौलतनगर कोल्हापूर असे सांगितले. नमुद इसमाची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचा गावटी कठ्ठा (अंदाजे किंमत ५ हजार रुपये) मिळून आला. सदर इसम व जप्त मुद्देमाल पुढील योग्य त्या कार्यवाही राजारामपुरी पोलीस ठाणेकडे जमा करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर शहराचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार रमजान इनामदार, गौरव चांगले, रोहित चौगुले, सुरेश देसाई, चौगुले, कांबळे व महिला पोलीस अंमलदार थोरात यांनी केली.