घरफोडी करणारा सराईत जाळ्यात!

स्थागुशाची कारवाई : पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त 

2 Min Read

सांगली : घरफोडी करणाऱ्या एका सराईताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडुन २१० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जु. वा. किंमत अंदाजे १२ लाख ४२ हजार रुपये व ४३२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जु. वा. किंमत अंदाजे ३० हजार १४० रुपये असा एकूण बारा लाख बहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा चा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सांगली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या पथकानी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, गुन्ह्याची माहिती काढताना असताना पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली. रेकॉर्डवरील आरोपी नामे स्वप्निल मोहन तरसे हा चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करीता उदयोग भवनच्या बाजुस असलेल्या मोकळया जागेजवळ येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने त्यास सोन्या चांदीच्या दागिन्यासह ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने सांगितले, गत काही दिवसांपूर्वी सांगलीतील विजय नगर चौकाजवळील सैनिक नगर, होळकर चौक, मीरा हौसिंग सोसायटी मधील बंद फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे सांगितले तर सदर चोरी केलेल्या दागिण्याची विक्री करणार होतो, असे सांगितले. स्वप्नील मोहन तरसे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, पोलीस अंमलदार बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, नागेश खरात, दरीबा बंडगर, मच्छिद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, संदीप नलावडे, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!