विधिसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त ; नांदेड स्थागुशाची कारवाई

1 Min Read

नांदेड : शहरातील काळेश्वर मंदिर परिसर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका विधीसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्तूलसह एक जिवंत काडतूस जप्त केलेे. त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

नांदेड येथील एकाकडे गावठी बनावटीची पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने काळेश्वर मंदिर परिसर गाठले. तेथे एका विधीसंघर्ष बालकाकडून गावठी पिस्तूलसह एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबीनाश कुमार, खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, विलास कदम, रणधीर राजबन्सी, गणेश धुमाळ, मोतीराम पवार, हेमंत बिचकेवार, सायबर सेलचे पोलीस अंमलदार राजू सिटीकर, दिपक ओढणे यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!