मौजमजेसाठी जबरी चोरी करुन मोबाईल व चैन चोरणारा जेरबंद

2 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत

| हिंजवडी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

हिंजवडी : पांडवनगर हिंजवडी येथून पायी जाणाऱ्या कोमल संतोष निकाळजे वय २२ वर्षे धंदा. घरकाम रा. बोडकेवाडी माण ता. मुळशी जि.पुणे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल हिसका देऊन अॅक्टीव्हा मोपेडवरुन आलेल्या तीन भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७९/२०२४ भारतीय दंड विधान कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान ३५ सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे तांत्रीक विश्लेषण करून संशयीत आरोपींचा व मोपेड गाडीचा शोध घेत असताना सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या बातमीप्रमाणे सपोनि राम गोमारे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने भुमकर चौक येथे सापळा रचुन शिताफीने नामे लोकेश दयानंद कांबळे वय १८ वर्षे ४ महिने रा. अष्टविनायक चौक किराणा दुकानाशेजारी मोरे वस्ती साने चौक चिखली पुणे यास ताब्यात घेवून त्याच्याकडुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल जप्त करून त्याचेकडे विचारपुस करता त्याचे साथीदार नामे १) कृष्णा धायींजे रा. रहाटणी २) विधीसंघर्षीत बालक यांचेसह दाखल गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेने त्यास ५ फेब्रुवारी रोजी अटक करून कौशल्याने तपास करता त्यांनी दाखल गुन्ह्यातील मोबाईल सोन्याचे मंगळसुत्र व पुढील तपासात त्यांनी १) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ९२४/२०२२, भादवि कलम ३९२ (२) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १६३/२०२३ भादवि कलम ३९२, ३४ हे गुन्हे केल्याचे निष्पन्न होवून त्यातील दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. अशा प्रकारे अटक आरोपीकडुन एकुण ३ मोबाईल व एक मंगळसुत्र असे एकुण ५९ हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तसेच ३ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!