३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ नाशिक येथे सपंन्न

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार

2 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

अकोला : महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ चे आयोजन ०४ फेब्रुवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये नाशिक येथे करण्यात आले होते. अकोला पोलीस दलातील ५४ खेळाडूंनी यात सहभाग नोंदविला होता. त्यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

१२ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदार त्यामध्ये मपोकों / १४१२ रूपाली मानकर तायक्वांदो ६७ किलो सुवर्ण पदक, पोकों /२१७६ सुयश जडीये बॉडीबिल्डींग ७५ किलो सुवर्ण पदक, पोकों / १७४४ उमेश भाकरे बॉडीबिल्डींग ८० किलो सुवर्ण पदक, पोकों / १७४४ उमेश भाकरे बॉडीबिल्डींग८० किलो सुवर्ण पदक, मपोकॉ /२५०४मिताली राउत व्हॉलीबॉल (महिला) रजत पदक, मपोकों /२५४७पल्लवी तायडे व्हॉलीबॉल (महिला) रजत पदक मपोकॉ / २५३०पुजा भटकर पॉवरलिस्टिंग / वेटलिस्टिंग ५२ किलो कांस्य पदक, पोहेका / ३७५इमरान खान बॉक्सिंग ७१ किलो कांस्य पदक, मपोहेकॉ/१९०३ सविता कुकडे (कर्णधार) मपोहेका /१९२४ रश्मी इंगळे मपोहेको / १९७५ दिपाली अग्रवाल मपोका /२२११ निता सनके मपोकों / १८७९ पुजा मढाइत बास्केटबॉल महिला) कांस्य पदक यांचा पोलीस अधीक्षक यांनी भेट वस्तु देवुन सत्कार केला व केलेल्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी मार्गदर्शन करणारे राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके, प्रशिक्षक रवि ठाकुर, अशपाक चव्हाण, तसेच सतिश वानखडे यांनाही सन्मानित करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!