तब्बल २९ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
Contents
तब्बल २९ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त| मुखपत्र दक्षता वृत्तांतसांगली : लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या एका घरात चोरांनी घुसखोरी करत तब्बल १८ तोळे सोने, वीस लाख रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला होता. ही घटना सांगली मधील समर्थ नगर परिसरातील कोल्हापूर रोड येथे घडलीे होती.याप्रकरणी विनोद श्रीचंद खत्री यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७/२०२४ भादविस कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे गांभीर्य ओळखत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या.त्या अनुषंगाने गुन्ह्याची उकल होण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते. (दि.१३) मंगळवार रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्तबातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, घरफोडी चोरी करून मिळालेले सोने विक्री करण्यासाठी दोन इसम अंकली फाटा येथे निळ्या रंगाच्या मोपेड मोटर सायकलवर येवून थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठया शिताफीने सदर २ इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. यावेळी सदरील दोघांकडे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन आली. सदरील दोन्ही इसमाना त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, नितेश चिकमठ याने सांगितले की, तो व त्याचा साथीदार राजु नागरगोजे असे दोघांनी मिळून कोल्हापुर रोड, समर्थ कॉलनी येथे मोपेड मोटर सायकल वरुन जावून पहाटे घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबूली दिली.सदर सोन्याचे दागिने व रोख रक्कमेबाबत सांगली शहर पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांचे कब्जातील १८ तोळे सोन्याचे दागिने, २० लाख रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली मोपेड मोटरसायकल अंदाजे किंमत ८० हजार रुपये असा एकूण एकोणतीस लाख बत्तीस हजार हजार रुपयांचा मुद्देमाल पुढील तपास कामी पोलिसांनी जप्त केला.नमूद गुन्ह्याची उकल कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वात सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस अंमलदार अनिल ऐनापुरे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, प्रकाश पाटील, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, रोहन घस्ते, सुरज थोरात, सायबर पोलीस ठाणेतील पोलीस अंमलदार श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, नायकोडे, पाटील यांच्या पथकाने केली.