नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स प्रती विक्री करीता तयार करून नकलीकरण/बनावटीकरण करणाऱ्या /बाळगणाऱ्या विरूद्ध कारवाई

3 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत

गोंदिया : येथील शहर आणि रामनगर परिसरातील काही झेरॉक्स दुकानामध्ये अधिकृत असलेल्या कंपनीच्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स प्रती काढून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. आणि गोंदिया शहर यांना सूचना देऊन कायदेशिर कारवाई करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांची वेगवेगळे पथके तयार करण्यात आलेली होती. याप्रकरणी मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे १६ फेब्रुवारी- २०२४ रोजी कारवाई केली असता  इसम नामे

  • १) शिवाणी झेराक्स चे मालक- रविकांत हरीप्रशाद जयस्वाल वय ६० वर्षे,

  • २) रानी झेराक्स चे मालक- उज्वल तुषारकांत जयस्वाल वय ३४ वर्षे

  • ३) लक्की झेराक्स चे मालक- चंद्र रमेश जोशी वय ३४ वर्षे राहणार तिन्ही – लोहीया वार्ड, एन. एम. डी. कॉलेज रोड, गोंदिया

हे त्यांचे मालकीचे झेरॉक्स दुकानामध्ये इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेकाळात उपयोगी येणारे नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंचाचे अवैधरित्या विना कायदेशीर अधिकार नसतांना देखील नवनित २१ अपेक्षीत प्रश्नसंच चे मायक्रो झेरॉक्स प्रती काढून स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता नकलीकरण/बनावटी तयार करून विक्री करीत असताना व बाळगताना मिळून आले. त्यांचे मालकीचे दुकानातून पुढील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे -१) शिवाणी झेराक्स मधून मायक्रो झेरॉक्स करून ठेवलेल्या एकुण ४५० नग प्रती. प्रत्येकी ३०/- प्रमाणे एकुण १३,५००/- रु. व मायक्रो झेरॉक्स काढण्याकरिता वापरती एक जुनी कॅनान कंपनी झेरॉक्स मशिन किमती अंदाजे ३५,०००/- रु., २) रानी झेरॉक्स सेंटर मधुन मायक्रो झेरॉक्स ४०० नग/ प्रती. प्रत्येकी ३०/- प्रमाणे एकुण १२,०००/- रु. व मायक्रो झेरॉक्स काढण्याकरिता वापरती जुनी क्युसेरा कंपनीची झेरॉक्स मशिन अंदाजे किंमती २५,०००/- रु., ३) लक्की झेरॉक्स सेंटर मधूनमायक्रो झेरॉक्स एकुण २०० नग/प्रती. प्रत्येकी ३०/- प्रमाणे एकुण ६०००/-व मायक्रो झेरॉक्स काढण्याकरिता वापरती एक जुनी पांढऱ्या रंगाची कॅनान कंपनीची झेरॉक्स मशीन अंदाजे किमती ७०,०००/- रूपये असा एकुण १ लाख ४५ हजार ३००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्याचे अनुषंगाने जप्त करण्यात आलेला आहे. नमुद तिन्ही इसमांनी अधिकृत नवनित एज्युकेशन लिमिटेड कंपनी नागपुर यांचे कॉपी राईट अॅक्ट चे अधिकाराचे उल्लघंन केल्याने नवनीत एज्युकेशन लिमिटेड नागपूर येथील रीजनल सेल्स मॅनेजर किशोर प्रभाकर सेलुकर यांच्या फिर्यादीवरून नमूद तिन्ही झेरॉक्स दुकान मालक यांचेविरुध्द कॉपी राईट अधिनियम १९५७ सुधारित अधि. १९८४, आणि १९९४ चे कलम ५१, ६३, ६५ अन्वये पो. स्टे. रामनगर येथे गुरनं ३९ /२०२४ अन्वये दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे पोउपनि- चण्णावार, पोलीस अंमलदार स.फौ. अर्जुन कावळे, पो.हवा. राजु मिश्रा, तुलसीदास लुटे, प्रकाश गायधने, सुजित हलमारे, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पो.शि. कापसे, म.पो.शि. करोशिया पो.ठाणे गोंदिया शहर यांनी केलेली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!