लातुरात साडे अकरा लाखांचा गुटखा जप्त 

1 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २१ फेब्रुवारी बुधवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बसवेश्वर चौक रिंग रोड येथे सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास ताब्यात घेत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व सुगंधित पानमसाला असा एकूण ११ लाख ४२ हजार ८७२ रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू व सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कार्पिओ कंपनीची सहा लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण १७ लाख ४२ हजार ८७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी उमर इस्माईल शेख, वय ३४ वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर व शेख आफताब मेहमूद, वय ३८ वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत.

               सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड, पोलीस अंमलदार नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, राहुल कांबळे यांनी पार पाडली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!