|मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्रदेश सचिव इब्राहीम सय्यद यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाट्न मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी जनसंपर्क कार्यालय पाहून खा. तटकरे यांनी समाधान व्यक्त केले व सय्यद यांचे कौतुकही केले. जनसामान्य लोकांच्या अनेक समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आपण त्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे ही जाण ठेवून आपण जनसंपर्क कार्यालय काढले आहे. त्यामुळे प्रत्येक समस्या घेऊन येणाऱ्या, पक्षासाठी काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना, काहीं अडचण, परिसरातील विविध प्रकारच्या अनेक कामासाठी नागरिकांना आपल्या पर्यंत येणे अधिक सोयीस्कर होईल व आपण पक्षाचे काम , धोरण, जनसंपर्कातून कार्यालयाच्या माध्यमातून अधिका अधिक जनतेपर्यंत पोहोचेल असे प्रतिपादन केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मान सत्कार, स्वागत करण्यात आले. त्यानंतर खा.तटकरे यांनी इब्राहिम सय्यद यांच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली. यावेळी सोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा रा.कॉ.पा.महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, अल्पसंख्यांक सेलचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवाडी, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर शेख, प्रदेश सरचिटणीस अॅड. व्यंकटराव बेद्रे, बबन भोसले, मुर्तूजा खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लातूर जिल्ह्यातील विविध पक्षातील व अल्पसंख्यांक समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेशअध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे व प्रदेश सचिव इब्राहीम सय्यद यांच्या नेतृत्वात रा.कॉ.पार्टीत प्रवेश केला.