लातूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार?

4 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर/ साईनाथ घोणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गाठीभेटी घेत तिकिटासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याने यंदा जागावाटपाचं गणितही बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर काही नेते आपला पक्ष सोडून मित्रपक्षाच्या चिन्हावरही निवडणूक लढवू शकतात. लातूर लोकसभेतही असंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे हे भाजपकडून लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. संजय बनसोडे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदगीर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे डॉ. अनिल कांबळे यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मतदार संघाला आमदार संजय बनसोडे यांच्या रूपाने अडीच वर्षे मंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे अडीच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉक भरून निघाला होता. मतदारसंघात महत्त्वाची असे प्रशासकीय कार्यालय, प्रशासकीय इमारती, रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाले होते. आघाडीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून संजय बनसोडे यांनी अत्यंत जबाबदारीने काम केले. शेतकरी असो, विद्यार्थी असो, निराधार असो, महिला असो, साहित्यिक असो अश्या सगळ्यांच स्तरातील सर्वसामान्य माणसांची त्यांनी कामे केली. दरम्यानच्या काळात सरकार गेल्याने ते विरोधी पक्षात राहिले आणि जिल्ह्याला मंत्रिपदाविना राहावे लागले. याचे फार मोठे नुकसानही सहन करावे लागले. जिल्ह्यामध्ये हक्काचा एकही मंत्री नसल्याने लोकांची कामे खोळंबली होती. त्यानंतर काही दिवसात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संजय बनसोडे यांनी अजित पवार यांची साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. ‘दादानिष्ठ’ अशी राजकीय पटलावर ओळख असणाऱ्या संजय बनसोडे यांना शिंदे सरकार मध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यांच्याकडे युवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे राज्याचे खाते आले आणि या खात्यातून उदगीरसह जिल्ह्यासाठी जे जे आणने शक्य आहे ते करत आहेत. लातूर आणि उदगीर येथे बालेवाडी सारखे सुसज्ज स्टेडियम उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच लातूर जिल्ह्यातील जनतेमध्ये विशेष करून युवकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याचसाठी जो तो आता संजय बनसोडे है तो मुमकिन है! असे म्हणतो आहे. आपल्या मंत्रीपदाचा कुठलाही रुबाब न दाखविता ते सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांच्याशी संवाद साधतात, प्रश्न कोणाचा आणि कोणताही असो तो शांतपणे ऐकून घेणे ही त्यांची खासियत आहे. विशेष म्हणजे काम करत असताना ते कोण कोणत्या पक्षाचा की कुठल्या जाती धर्माचा हे कधीच पाहत नाहीत. त्यांच्यासाठी समोरचा काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो. त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीमुळेच ते कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांनाही जवळ आपलेसे वाटतात. संजय बनसोडे आमदार झाल्याने तालुक्याच्या/ जिल्ह्याच्या विकासाबरोबर सर्वसामान्य जनतेचे कामे मार्गी लागण्यास गती मिळाली आहे आता ते खासदार झाल्यास केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आणून लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर लातूर जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत ठेवतील. विकासाचा बॅकलॉक भरून निघेल. विकासाबरोबर युवकांच्या रोजगारासाठी भरीव कामगिरी करतील अशा भावना लोकांतून व्यक्त केल्या जात आहेत. राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदार संघात ना. संजय बनसोडे यांना उमेदवारी दिल्यास भाजपला या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. ना. बनसोडे यांना मानणारा जिल्ह्यात मोठया प्रमाणात वर्ग आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याबाबतची सर्वत्र चर्चा रंगत आहे. दरम्यान, लातूर मतदारसंघातून मागच्या निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांचा विजय झाला होता. मात्र मागील पाच वर्षांत सुधाकर शृंगारे यांनी मतदारसंघात म्हणावा तसा जनसंपर्क ठेवला नाही. त्यामुळे भाजपकडून यंदा उमेदवारीसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. ना.संजय बनसोडे यांना भाजपात व मिञ पक्षात मानणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यांना आयात केल्यानंतर पक्षातील इतर पदाधिकारी त्यांची उमेदवारी स्वीकारणार का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!