महाराष्ट्र शासन व व्हॉइस ऑफ मीडियाच्या “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने डॉ.धर्मवीर भारती यांचा मुंबईत गौरव

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन आणि पञकारांसाठी देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस आँफ मीडिया संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तींना मुंबई येथे सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.

          यामध्ये बांधकाम क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय व भरीव काम करणाऱ्या डॉ.धर्मवीर भारती यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याला राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच युवा सेनेचे प्रमुख माजी मंत्री आ.आदित्य ठाकरे, आ.रोहित पवार,माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर,आ.राहुल पाटील. प्रवीणदादा गायकवाड यांच्या उपस्थिती मध्ये डॉ.धर्मवीर भारती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्हाईस आँफ मिडीया संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे, पञकार दिव्या भोसले, सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!