आयएमएथॉन स्पर्धेत १ हजार ४९५ स्पर्धक सहभागी होणार : डॉ. अनिल राठी यांची पत्रकार परिषदेत माहिती

3 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर तर्फे आयोजित आयएमएथॉन लातूर २०२४ ही मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. ३ मार्च २०२४ रोजी होणार असून ह्या स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या स्पर्धेत एकूण १ हजार ४९५ स्पर्धक सहभागी होणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनिल राठी यांनी सांगितले.

आयएमएच्या ही आयोजित करण्यात येत असलेली ही चौथी आवृत्ती असून दरवर्षी आयएमएथॉनला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. या मॅरेथॉनसाठी १४९५ धावपटूंनी आपली नावे नोंदवली आहेत. आयएमए लातूरच्या वतीने ह्या मॅरेथॉनची थीम तिला सक्षम करा, सर्वांना उन्नत करा, प्रत्येक टप्प्यावर समानतेसाठी धावा अशी ठेवण्यात आलेली आहे. आठ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचे सक्षमीकरण आणि समानता अशी थीम आयोजकांनी विचारपूर्वक निवडलेली आहे. यावेळी बोलताना डॉ.अनिल राठी यांनी सांगितले की, २१ किमी स्पर्धेत एकूण १७१ स्पर्धक सहभागी होत असून त्यात महिलांची संख्या २४ तर पुरुषांची संख्या १४७ आहे. १० किमी स्पर्धेत एकूण ५१३ स्पर्धक सहभाग नोंदवत असून त्यात महिला ७५ आणि पुरुष ४३८ आहेत. ५ किमीमध्ये २३२ महिला व ३५२ पुरुष सहभागी होणार आहेत. तर ३ किमी स्पर्धेत १२२ महिला आणि १०५ पुरुष सहभागी होणार आहेत.

लातूरमध्ये होणारी ही एकमेव हाफ मॅरेथॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील स्पर्धकांसोबत इतर जिल्ह्यातील स्पर्धकही उत्साहाने सहभाग नोंदवितात. ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी अंतरासाठी होणार आहे. २१ किमी. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १२ हजार रुपये, द्वितीय ८ हजार, तृतीय ६ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. १० किमी. अंतरासाठी प्रथम पारितोषिक ७ हजार, द्वितीय ५ हजार तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये आहे. डॉक्टर्स गटासाठी तसेच त्यांचे कुटुंबिय व सर्वसामान्य जनतेमध्ये धावणे हा व्यायाम प्रकार रुजावा व त्याचे आरोग्यविषयक फायदे सर्वांना कळावे यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा अनेकांना प्रोत्साहित करणारी ठरली आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना मेडल्स आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत. ही स्पर्धा दि. ३ मार्च रोजी सकाळी ५.३० मान्यवरांच्या हस्ते बिडवे लॉन्स याठिकाणी हिरवी झेंडी दाखवून सुरु होणार असून स्पर्धेचा समारोप सकाळी ९ वाजता बक्षिस वितरण सोहळ्याने होणार आहे.

 इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरच्या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी, आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी व स्त्री शक्तीला सक्षम करण्यासाठी आयएमएथॉन २०२४ लातूरमध्ये जरूर सहभागी व्हावे व आपल्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी व्यायामाची सुरुवात आनंददायी पध्दतीने करा असे आवाहन आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे, वूमेन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. प्रिती बादाडे, सचिव डॉ. प्रियंका राठोड, उपाध्यक्ष डॉ.अशोक पोद्दार, डॉ.अनुजा कुलकर्णी, डॉ.हर्षवर्धन राऊत, डॉ.राजेश दरडे, डॉ.जितेन जयस्वाल, कोषाध्यक्ष डॉ.अर्जुन मंदाडे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.आरती झंवर, डॉ.चांद पटेल, डॉ.ब्रिजमोहन झंवर, क्रीडा समितीचे सदस्य डॉ.अजय जाधव, डॉ.शशिकांत कुकाले, डॉ.चेतन सारडा, डॉ. विक्रम सारडा, डॉ.शितल ठाकूर – टीके, डॉ. सतीश हंडरगुळे, डॉ. चंद्रशेखर अष्टेकर, डॉ. ज्योती सूळ, डॉ. केतकी चवंडा यांसह सर्व आयएमए पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!