| मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी चार लाख २९ हजार ८०० रुपयांची रक्कम पळविल्याची घटना उदगीर येथील हारकरे नगर, नांदेड रोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली.
याबाबत उदगीर ग्रामीण पोलिसांत सोमवारी (दि.२६) रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले करत आहेत.