ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम फिर्यादीस परत करण्यात सायबर पोलीसांना यश

1 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

धाराशिव : लोन घेण्यासाठी मोबाईलवर लोन ॲप सर्च करत असताना नमुद मोबाईल धारकांनी मी निधी शर्मा बोलते असे सांगून वेगवेगळ्या फोनवरुन फिर्यादीस फोन करुन तुम्हाला तीन लाख रुपये लोन देतो त्यासाठी प्रोसेसींग फीस पाठवा असे म्हणून फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवलेल्या क्युआर कोड वर एकुण 73,555 पाठवले परंतु त्यांना कसले ही लोन मिळाले नसल्याने त्यांची फसवणुक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने फिर्यादी मनिषा रविंद्र गायकवाड, वय 38 वर्षे, रा.उपळा ता. जि. धाराशिव यांनी सायबर पोलीस ठाण्यात सदर घटनेबाबत फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे सायबर येथे कलम 420 सह कलम 66 सी, 66 डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2008 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हृयाच्या तपासा दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक बबीता वाकडकर, महिला पोलीस अमंलदार अपेक्षा खांडेकर सह सायबर पोलीस ठाण्याचे पथक यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषण करुन तसेच आरोपीचे बँक खात्यांची माहिती घेवून फिर्यादी यांनी पाठवलेले 73 हजार 755 रुपये रक्कमे पैकी 53 हजार 667 रुपये होल्ड करुन सदर रक्कम ही न्यायालयाचे आदेशावरुन फिर्यादीस परत करण्यात यश मिळवले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!