लातूरकर खळखळून हसले : इंजि.विश्वजित गायकवाड मित्रमंडळ आयोजित ‘चला हवा येऊ द्या’ला लातूरात प्रचंड प्रतिसाद

3 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : येथील इंजि.विश्वजित गायकवाड मित्रमंडळ आयोजित ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला लातूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून कलाकारांनी सादर केलेल्या कलेला जनतेने अक्षरशः टाळ्या,शिट्ट्यानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क दणाणून गेले होते. आपण दररोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त असतो, यातून आपला तणाव दूर करण्यासाठी गरज असते ती निखळपणे हसण्याची, आणि हेच हास्य लातूरकरांच्या चेहऱ्यावर घेऊन येण्यासाठी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड मित्रमंडळ यांनी लातूरकरांच्या भेटीला आणला होता, “चला हवा येऊ द्या” हा हास्य निर्मिती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पार पडलेल्या ह्या लोकप्रिय कार्यक्रमात जनसागर उसळलेला सर्व लातूरकरांनी पाहिला. ह्या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व विनम्र अभिवादनाने झाला. त्या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले भाजप लातूर जिल्हा शहर अध्यक्ष देविदास काळे, प्रमुख पाहुणे वेंकटसिंग चौहान, लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आ.बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, विधानसभा प्रभारी गुरुनाथ मगे, भाजपाच्या प्रवक्ता प्रेरणा होनराव, अहमदपूर तालुका अध्यक्ष प्रतापराव पाटील, नागु सिंह, माजी नगरसेवक चंद्रकांत चिकटे आदींनी दिप प्रज्वलन करत, उपस्थित लातूरकरांना संबोधित करत कार्यक्रमाची सुरुवात केली.

Contents
| मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर : येथील इंजि.विश्वजित गायकवाड मित्रमंडळ आयोजित ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला लातूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून कलाकारांनी सादर केलेल्या कलेला जनतेने अक्षरशः टाळ्या,शिट्ट्यानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क दणाणून गेले होते. आपण दररोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त असतो, यातून आपला तणाव दूर करण्यासाठी गरज असते ती निखळपणे हसण्याची, आणि हेच हास्य लातूरकरांच्या चेहऱ्यावर घेऊन येण्यासाठी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड मित्रमंडळ यांनी लातूरकरांच्या भेटीला आणला होता, “चला हवा येऊ द्या” हा हास्य निर्मिती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पार पडलेल्या ह्या लोकप्रिय कार्यक्रमात जनसागर उसळलेला सर्व लातूरकरांनी पाहिला. ह्या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व विनम्र अभिवादनाने झाला. त्या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले भाजप लातूर जिल्हा शहर अध्यक्ष देविदास काळे, प्रमुख पाहुणे वेंकटसिंग चौहान, लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आ.बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, विधानसभा प्रभारी गुरुनाथ मगे, भाजपाच्या प्रवक्ता प्रेरणा होनराव, अहमदपूर तालुका अध्यक्ष प्रतापराव पाटील, नागु सिंह, माजी नगरसेवक चंद्रकांत चिकटे आदींनी दिप प्रज्वलन करत, उपस्थित लातूरकरांना संबोधित करत कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसभेचे इच्छुक उमेदवार इंजि.विश्वजित गायकवाड यांनी केले आणि उपस्थित मान्यवरांनी एमएसआरडीसी चे मॅनेजिंग डायरेक्टर इंजि. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे मोदी सरकारच्या आधुनिक रस्त्यांच्या व्हिजन मधील योगदान अधोरेखित करत, आजोबा कै.बळीरामजी गायकवाड आणि खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास आजोबांना लाभला होता, ते म्हणायचे “आपण ज्या समाजाकडून घेतो त्याची परतफेड आपण सामाजिक कार्यातूनच केली पाहिजे.” त्यांनाच आदर्श मानून माझ्या कुटुंबाने भारत देशाची व लातूरकरांची नेहमी सेवा केली आहे. इंजि.अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनीही एमएसआरडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहताना समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा जो महाराष्ट्र राज्यातील शक्तीपीठांना जोडणारा आहे, तो लातूरमार्गे नेण्यासाठी त्याच सामाजिक भावनेतून विशेष प्रयत्न केले. उपस्थित मान्यवरांनी बोलल्याप्रमाणे विश्वजित गायकवाड हे उच्च शिक्षित, यशस्वी उद्योजक, फिल्म निर्माता आहेत. परंतु त्यापेक्षाही ते एक संवेदनशील माणूस आहे, ज्याला सामाजिक हित जास्त महत्वाचे आहे. याच भावनेतून भाजप पक्षाच्या माध्यमातून लातूरची सेवा करण्याचा दृढ असा संकल्प केलेला आहे. चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमाला आपण लातूरकरांनी दिलेला उदंड असा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. भाजपचे महाराष्ट्र सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी इंजि.अनिलकुमार गायकवाड यांनी शक्तीपीठ मार्ग हा लातूरहून नेऊन आपल्या कामाच्या माध्यमातून लोकसभे अगोदर कामाची सुरुवात केली आहे असे सांगून हा परिवार देण्यासाठी प्रसिद्ध आहे असे सांगितले तर माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी एक तरुण चेहरा लातूरला मिळत असल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे आभार माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर आणि क्षिप्रा मानकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकसभेचे इच्छुक उमेदवार इंजि.विश्वजित गायकवाड यांनी केले आणि उपस्थित मान्यवरांनी एमएसआरडीसी चे मॅनेजिंग डायरेक्टर इंजि. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे मोदी सरकारच्या आधुनिक रस्त्यांच्या व्हिजन मधील योगदान अधोरेखित करत, आजोबा कै.बळीरामजी गायकवाड आणि खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास आजोबांना लाभला होता, ते म्हणायचे “आपण ज्या समाजाकडून घेतो त्याची परतफेड आपण सामाजिक कार्यातूनच केली पाहिजे.” त्यांनाच आदर्श मानून माझ्या कुटुंबाने भारत देशाची व लातूरकरांची नेहमी सेवा केली आहे. इंजि.अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनीही एमएसआरडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहताना समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा जो महाराष्ट्र राज्यातील शक्तीपीठांना जोडणारा आहे, तो लातूरमार्गे नेण्यासाठी त्याच सामाजिक भावनेतून विशेष प्रयत्न केले. उपस्थित मान्यवरांनी बोलल्याप्रमाणे विश्वजित गायकवाड हे उच्च शिक्षित, यशस्वी उद्योजक, फिल्म निर्माता आहेत. परंतु त्यापेक्षाही ते एक संवेदनशील माणूस आहे, ज्याला सामाजिक हित जास्त महत्वाचे आहे. याच भावनेतून भाजप पक्षाच्या माध्यमातून लातूरची सेवा करण्याचा दृढ असा संकल्प केलेला आहे. चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमाला आपण लातूरकरांनी दिलेला उदंड असा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. भाजपचे महाराष्ट्र सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी इंजि.अनिलकुमार गायकवाड यांनी शक्तीपीठ मार्ग हा लातूरहून नेऊन आपल्या कामाच्या माध्यमातून लोकसभे अगोदर कामाची सुरुवात केली आहे असे सांगून हा परिवार देण्यासाठी प्रसिद्ध आहे असे सांगितले तर माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी एक तरुण चेहरा लातूरला मिळत असल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर आणि क्षिप्रा मानकर यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!