शिवसेना उप तालुकाप्रमुख पदी‎ बळवंत सगर

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : चाकूर तालुक्यातील‎ वडवळ नागनाथ येथील शिवसैनिक बळवंत सगर यांची शिवसेना चाकूर उपतालुकाप्रमुख ( कार्यक्षेत्र वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गट ) पदी‎ निवड करण्यात आली. चाकूर येथे जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांचे प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता.२७) ही घोषणा झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांनी श्री. सगर यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. नूतन उप तालुकाप्रमुख बळवंत सगर यांचे जिल्हा प्रमुख गोपाळ माने, जेष्ठ शिवसैनिक विवेकानंद पाटील आदींनी अभिनंदन केले. पक्षाच्या उप तालुका प्रमुखपदी निवड झाल्याने बळवंत सगर यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!