| मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर : लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापार सेल च्या जिल्हाध्यक्षपदी युवा उद्योजक ताज शेख यांची लातूर येथे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांच्या संमतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत विविध घटकातील स्तरांपर्यंत अनेक सेल मार्फत संघटना मजबूत करण्यात येत आहे. लातूर शहरातील वाढत असलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाने त्याच क्षेत्राशी जाण असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींना अधिकार देऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी कुशलतेने प्रयत्न करताना दिसत आहे. लातूर येथील युवा उद्योजक ताज शेख हे स्वतः उद्योग व व्यापार क्षेत्रात प्रचलित आहेत.
ह्या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष ईद्रीस नाईकवाडी, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर शेख, प्रदेश सरचिटणीस ॲड.व्यंकटराव बेद्रे, बबन भोसले, मुर्तूजा खान, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील हे उपस्थित होते.