चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू ; कष्टकरी आईबापाची सावली कायमची हरवली

1 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत

उदगीर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे धक्कादायक घटना घडली आहे. उदगीर येथील गोपाळ नगर परिसरातील गुरुवारी ( २९ फेब्रुवारी) चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. महादेव संतोष डोंगरे (वय १४)असे मयताचे नाव आहे. महादेव आई वडीलांना एकटाच होता. महादेवचे वडील ऑटो चालक असून अंत्यत कष्टातून ते महादेवला शिक्षण देत होते.

घरातून खेळण्यासाठी बाहेर गेला आणि परत आलाच नाही

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत महादेव संतोष डोंगरे घरातून खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला. दरम्यान, रात्र झाली तरी तो घरी परत आला नसल्याचे लक्षात आले. यानंतर मुलाचा शोध सुरु करण्यात आला. शोध घेऊनही मुलगा सापडत नसल्याने आई वडिलांचा जीव टांगणीला लागला.

विहिरीमध्ये तरंगताना मुलाच्या चपला दिसल्या

दरम्यान, शोध सुरु असतानाच बागेशाम जवळील सरकारी विहिरीमध्ये तरंगताना मुलाच्या चपला दिसून आल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता मुलाचा मृतदेह सापडला.
चिमुकल्याचा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महादेव खेळताना विहिरीत पडल्याचा संशय आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!