रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी आ. कराड यांच्या प्रयत्नातून १० कोटीचा निधी

4 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : रेणापूर नगरपंचायत अंतर्गत विविध १० विकास कामासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून सदरील निधी मंजूर झाल्याने रेणापूर येथील पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकाऱ्यांनी आ. कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत.
रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी निधी मिळावा याकरिता भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने नगर विकास विभागाच्या सन २०२३ – २४ वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार रेणापूर नगरपंचायत अंतर्गत १० कामाकरिता तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रेणापूर येथील पुरातन प्रभू श्रीराम मंदिरास आ. रमेशआप्पा कराड यांनी सदिच्छा भेट दिली असता या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असा शब्द दिला होता. काही महिन्यातच त्यांनी २ कोटीचा निधी मंजूर करून दिल्याने भाविक भक्तात त्याचबरोबर रेणापूर शहरातील अंगणवाडीं सुधारणा करण्यासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे अंगणवाडीच्या सेविका मदतनीस यांच्यासह बालगोपालाच्या पालकात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंजूर करण्यात आलेल्या विविध कामात रेणापूर नगर पंचायत अंतर्गत प्रभु श्रीरामचंद्र मंदिर जवळील गार्डन विकसीत करणे २ कोटी, रेणापूर नगर पंचायत अंतर्गत पोलीस स्टेशन ते मेन रोड पर्यंत नाला बांधकाम करणे १ कोटी ३० लक्ष, प्रभाग क्र. १ मध्ये नगरपंचायत ते रुपेश अकनगिरे यांच्या परापर्यंत सी. सी. रोड व नाली करणे ८० लक्ष, प्रभाग क्र. ६ मध्ये बालाजी मंदिर परिसरात सी. सी. रोड व नाली बांधकाम करणे ५० लक्ष, रेणापूर नगरपंचायत अंतर्गत ओमनगर येथे स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे ५० लक्ष, प्रभाग क्र. २ मध्ये हणमंतवाडी तांडा येथे सभागृह बांधकाम करणे ३० लक्ष, प्रभाग क्र. ३ मध्ये प्रभु श्रीरामचंद्र मंदिर समोरील रस्ता सी. सी. रोड व नाली बांधकाम करणे ३० लक्ष, प्रभाग क्र. ५ मध्ये बळी कुरे ते सरवदे यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड ब नाली बांधकाम करणे ३० लक्ष, रेणापुर नगर पंचायत अंतर्गत ईदगाह जवळ कंपाऊंड वॉल व लादीकरण करणे १ कोटी, रेणापूर नगर पंचायत अंतर्गत सर्व अंगणवाडी विकसीत करणे ३ कोटी, याप्रमाणे १० कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
रेणापूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आत्तापर्यंत भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाच्या नगर विकास विभागामार्फत विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून अनेक विकासाची कामे कार्यान्वित केली तर नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध कामे प्रगती पथावर आहेत, एवढा मोठा निधी आजपर्यंत कधीच रेणापूरच्या इतिहासात मिळाला नव्हता. वेळोवेळी सर्व संबंधिताकडे पाठपुरावा करून कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी नगराध्यक्षा आरती राठोड, संगायो समिती सदस्य चंद्रकांत कातळे, माजी सभापती दत्ता सरवदे, विजय चव्हाण, उज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, भाजपा शहराध्यक्ष अच्युत कातळे, भाजयुमो शहराध्यक्ष संतोष राठोड, राजकुमार आलापुरे, उत्तम चव्हाण, मारूफ आतार, उत्तम घोडके, दिलीप चव्हाण, अंतराम चव्हाण, रमेश वरवटे, शेख अजीम, रमेश चव्हाण, गणेश चव्हाण, सचिन सिरसकर, धम्मानंद घोडके, नंदकुमार बंडे, रोहित खुमशे योगेश राठोड नागेश बस्तापुरे, मनोज चक्रे, गणेश माळेगावकर, सुरज फुलारी, लखन आवळे, पप्पू कुडके, हनुमंत भालेराव, जगन्नाथ कातळे, परमेश्वर राठोड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!