रमजान महिन्याच्या उपवासाच्या वेळापत्रकाचे मुंबई येथे अनावरण

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : मुस्लीम समुदायातील रमजान महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्याची सुरुवात चंद्राला पाहून होते. रमजान महिना हा कधी 29 दिवसाचा असतो तर कधी 30 दिवसाचा असतो. रमजान महिना सुरू होताच मुस्लीम बांधव रोजा म्हणजेच उपवास ठेवतात. याचअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व रा.काँ.पा.चे प्रदेश सचिव इब्राहीम सय्यद यांच्या पुढाकाराने व रा.काँ.पा.चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, ना.छगन भुजबळ, ना.हसन मुश्रीफ, ना.धनंजय मुंडे, ना.आदिती तटकरे, बाबा सिद्दिकी यांच्या उपस्थितीत पवित्र रमजान महिन्याच्या उपवासाच्या वेळापत्रकाचे अनावरण मुंबई येथे करण्यात आले.

या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राज्याच्या महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रिस नाईकवाडी, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, लातूर व्यापार व उद्योग शहर जिल्हाध्यक्ष ताज शेख, विद्यार्थी प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहिरे, उमर फारूख सय्यद यावेळी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!