एम्स परिवाराच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

3 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 11 मार्च 2024 रोजी दयानंद सभागृह लातूर येथे सायं 4.30 वाजता एम्स परिवाराने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र समिती प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे हे उदघाट्क म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्ष म्हणून समाजसेविका स्मिता परचुरे उपस्थित राहणार आहेत तर माजी आ.बब्रुवान खंदाडे, प्रदेश भाजपचे डॉ. अनिल कांबळे, माजी उप महापौर चंद्रकांत बिराजदार, भाजपा युवा नेते विश्वजित गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीसाठी 350 शेतकऱ्यांना संस्थेमार्फत दत्तक घेतले जाणार आहे. कृषि विभाग,राज्य व केंद्र शासन यांच्या माध्यमातून 350 शेतकऱ्यांना झिरो बजेट शेतीचे तंत्र अवगत करून देण्यात येणार आहे. रासायनिक शेती मुळे जमीनीची होणारी हानी आणि उत्पादित होणारी रसायनयुक्त अन्न पदार्थ थांबवण्यासाठी एकत्रित समूहाने प्रयत्न करने गरजेचे आहे तेंव्हा या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला जाणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील 350 कामगारांना शासकीय मदत मिळवून देण्याचे प्रयत्न संस्थे मार्फत केले जाणार आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सन्मान या निमित्त होणार आहे यात मागील 4 वर्षात शेत रस्तेकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे आमदार अभिमन्यू पवार यांनी 1300 किलोमीटरचे शेत रस्ते बनवून शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. त्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. विभागीय कृषि सह. संचालक साहेबराव दिवेकर. उत्कृष्ट अधिकारी असणारे साहेबराव दिवेकर यांनी आपल्या नोकरीच्या काळात अतिशय कर्तव्यदक्ष पद्धतीने कार्य केले असून कायम शेतकऱ्यांच्या आणि समाजाच्या हितासाठी प्रयत्न करतात त्यांना संस्थेचा जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ, लातूर चे अधीक्षक अभियंता असणारे सलीम शेख हे शिस्तप्रिय आणि मितभाषी म्हणून प्रसिद्ध आहेत.उच्च पदावर असून देखील कायम सामाजिक नाळ जोडून असणारे सलीम शेख यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कामगार विभागाचे विभागीय सह. आयुक्त मंगेश झोले हे अतिशय अभ्यासू, तरुण तडफदार व्यक्तिमत्व असून कायम नाविन्याची ओढ ठेवून कार्य करीत असतात. सामाजिक क्षेत्रात देखील सढळ हाताने मदत करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनाही संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. बालाजी पाटील चाकूरकर जे विशेषतः सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ओळखले जातात मागील 25 वर्षांपासून अविरत ते सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहेत. संपूर्ण आयुष्याच समजासाठी खर्ची घालणाऱ्या यां व्यक्तिमत्वचा देखील सन्मान होणार आहे. अमोल पाटील हे कृषिसेवक म्हणून कार्यरत असून हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. यांचाही सन्मान संस्थेच्या वतीने होणार आहे. सेंद्रिय खत निर्मिती हा विषय जनाधार संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे हे मांडणार आहेत. एकूणच एक समाजाला, शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद हुंडेकर यांनी केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!