राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

2 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत

उदगीर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात क्रीडा क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचअनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिल्पाताई संजय बनसोडे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस, युवराज नाईक, जगन्नाथ लकडे, अर्जुन पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, लातूरचे माजी नगराध्यक्ष ॲड.व्यंकटराव बेद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲड. प्रदीपसिंह गंगणे, पै. विजय चौधरी, पै. नामदेव कदम, पै. बापूसाहेब लोखंडे, पै. सय्यद चाऊस, पै. अस्लम काझी, समीर शेख, संग्राम पाटील, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू प्रदीप देशमुख यांनी उपस्थित खेळाडूंना शपथ दिली. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाचा समारोप झाला. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यांच्या नामफलकांसह पथसंचलन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!