राज्यात, देशात सत्ताधाऱ्यांना बहुमताचा आकडा गाठू देणार नाही – ॲड. अण्णाराव पाटील

2 Min Read

महा- राष्ट्र विकास समितीची २५ लोकसभा मतदारसंघात चाचपणी 

लातूर : राज्यात, देशात आजवर सत्तेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांकडून संविधानाला अनुसरून काम झाले नाही, यापुढे भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधानालाच धोका आहे. विरोधी पक्षही आपली भूमिका कठोरपणे मांडत नाही त्यामुळे भाजप, काँग्रेस सह त्यांच्या सहकारी पक्षांना बहुमताचा आकडा गाठू देणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

     आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या पक्ष संघटना एकत्रित घेऊन महाराष्ट्र विकास आघाडी प्रस्थापित पक्षांना रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आघाडीचे ॲड.अण्णाराव पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सामान्य माणसाच्या हातात सत्ता आली पाहिजे, मतांसाठी जाती धर्माचा वापर करुन जनतेला फसवण्याचे काम प्रस्थापितांनी केले आहे. खोटे आश्वासन देऊन दाखवून शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम केले आहे. सध्याची राज्यातली व देशातली राजकीय परिस्थिती पाहता कुणाला मतदान करावे यासाठी मतदार संभ्रमात असून उच्चशिक्षतांनी राजकारणात आलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडून संविधानाची वारंवार पायमल्ली केली जाते हे सर्व जनता उघड्या डोळयांनी पहात आहे. परंतु त्यांच्यापुढे सक्षम पर्याय नसल्यामुळे पुन्हा हीच पक्ष सत्तेत येत आहेत. यावेळी महा- राष्ट्र विकास समितीच्या माध्यमातून उच्चशिक्षिताना संधी देण्यात येणार आहे. यावेळी परिवर्तन अटळ आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. हे सर्व सामान्य जनतेचे दुर्दैव आहे. त्यासाठी सर्व जाती धर्माना एकत्र करुन लहान मोठ्या जाती जातीची युती करत जवळपास सात पक्ष संघटना व सामाजिक काम करणाऱ्या समाज संघटना एकत्र येऊन ॲड. अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राज सत्तेसाठी एक सक्षम आघाडी करून पर्याय दिला आहे. असे आवाहन यावेळी ॲड. आण्णाराव पाटील यांनी केले.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतअप्पा उबाळे, प्रदेशाध्यक्ष ॲड.नरेश आंबडकर, महासचिव ॲड.अनिरुद्ध येचाळे, राज्य उपाध्यक्ष माधवराव भिंगोले, भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय बोरकर, फोरवर्ड ब्लॉक ऑफ इंडिया डॉ.अंकुश नवले, प्रजा सुराज्य पक्षाचे दशरथ राऊत, सचिन डगे, अमरावती, प्रशांत गोडसे, विदर्भ, राष्ट्रीय सहसचिव उमरदराज खान, राज्य मीडिया प्रमुख प्रा.चंद्रकांत हजारे, मराठवाडा संपर्क प्रमुख गजेंद्र गूळ, इस्माईल फुलारी, सुशील होळकर, गीताताई सौदागर यांची उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!