सज्जनांचे संगोपन करा – डॉ. विठ्ठल लहाने

2 Min Read

सप्तफेरे वधू-वर सुचक केंद्रातर्फे विविध पुरस्कारांचे वितरण संपन्न

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : जिल्ह्यामध्ये गेल्या १२ वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग नोंदविणाऱ्या सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना जाहीर झालेले पुरस्कार वितरण सोहळा १० मार्च रोजी लातूर येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी देशातील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन तथा लातूरचे सुपुत्र डॉ. विठ्ठल लहाने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर हे कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लातूर वृक्षचे सुपर्ण जगताप, पंचायत समितेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील दापकेकर, उद्योजक नागनाथ गिते, पत्रकार शशिकांत पाटील, द्वारकादास श्यामकुमार चे संचालक तुकाराम पाटील, सोनू डगवाले हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष संजय राजुळे यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना, आयुष्यभर समाजसेवेची कास धरून कार्य करणाऱ्या आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना समाजासमोर आणण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल लहाने यांनी सज्जनांचे संगोपन करायला हवे असे ठासून सांगत उत्तम चारित्र्य, संस्कारमय जीवन व शिस्तबद्ध आयुष्य घडविण्यासाठी समाज घडवणाऱ्या सज्जनांचे संगोपन करा असे सांगितले. आजकाल चांगली बोलणारी, वागणारी माणसे फार कमी आहेत आणि अशी माणसे समाजासमोर आणण्याचे काम सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्र पुढच्या वर्षी अजून जोमाने करेल असा आशावाद प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील २० व्यक्तींना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश खोसे, बालाजीअप्पा पिंपळे, गंगाधर डिगोळे, रविकिरण सुर्यवंशी, लहु शिंदे, विद्यासागर पाटील, संतोष सोनवणे, अमोल घायाळ, वीरभद्र तरगुडे, गुरुराज माळेवाडे, साईनाथ घोणे आदींनी परिश्रम घेतले. सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक सचिव माधव तरगुडे यांनी आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!