MPSC तर्फे घेण्यात आलेल्या PSI परीक्षांचा निकाल जाहीर

1 Min Read

> मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : MPSC तर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२२ या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावाची यादी आणि पात्रता गुण MPSCने संकेतस्थळावर जाहीर केले. न्यायाधिकरणाच्या निकालाच्या अधीन तृतीयपंथी उमेदवारांचा निकाल राखून ठेऊन मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. मुख्य परीक्षेसाठी अर्जाद्वारे सादर केलेले दावे पात्रतेच्या आधारेच निवडीसाठी आजमावण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. शारीरिक चाचणी आणि मुलाखतीबाबत स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल. शारीरिक चाचणी डिजिटल प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!