देशभरात आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त ; जाणून घेऊया भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

2 Min Read

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर असे ठरवले जातात 

जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे आणि दर 15 दिवसांनी त्यात बदल होत असे. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेलचे दरही सरकारने निश्चित केले होते. 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे कामही तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीचा खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.

>>मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्याआधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचे हे स्वस्त दर 15 मार्च सकाळी 6 वाजेपासून देशभरात लागू होणार आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्राने 21 मे 2022 रोजी किमती कमी केल्या होत्या. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवर (X) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी घट करुन एकदा पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, मोदींचं कोट्यवधी भारतीयांच्या परिवाराचं हित आणि सुविधांवर लक्ष्य आहे”, असं केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी गुरुवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाले. याआधी राजस्थान सरकारने आपल्या राज्यातील डिझेल आणि पेट्रोलवरील व्हॅट 2 टक्क्यांनी कमी केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!